महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात बँकेचे कर्मचारी पैसे काढून देण्यासाठी जाताहेत गावोगावी

जिल्ह्यातील बँकांसमोर पैसे काढण्यासाठी मोठ मोठ्या रांगा लागत होत्या. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत होता.

वाशिम जिल्ह्यात बँकेचे कर्मचारी पैसे काढून देण्यासाठी जाताहेत गावोगावी
वाशिम जिल्ह्यात बँकेचे कर्मचारी पैसे काढून देण्यासाठी जाताहेत गावोगावी

By

Published : Apr 7, 2020, 10:20 AM IST

वाशिम - जिल्ह्यातील बँकांसमोर पैसे काढण्यासाठी मोठ मोठ्या रांगा लागत होत्या. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत होता. यावर जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी ग्रामीण भागात पैसे मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आवाहन केले.

वाशिम जिल्ह्यात बँकेचे कर्मचारी पैसे काढून देण्यासाठी जाताहेत गावोगावी

आता बँकेचे प्रतिनिधी गावो गावी जाऊन पॉस मशिनद्वारे ग्राहकांना पैसे देत आहेत. विशेष म्हणजे हे पैसे काढण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करण्यात येत असून पॉस मशीनवर आधार प्रमाणिकरणासाठी आवश्यक असलेल्या बोटांना सॅनिटायझर लाऊन ते बोट मशीनवर ठेवल्यावर पैसे देण्यात येत आहेत. बँकेद्वारे काटा गावात पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून शहरातील नाहक होणारी गर्दी ही टळली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details