महाराष्ट्र

maharashtra

पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणात घाणेरडे राजकारण झाले - संजय राठोड

मी ओबीसींचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. माझे राजकीय जीवन उध्वस्त करण्याचा घाणेरडा प्रयत्न या प्रकरणात झाल्याचे आपण पाहिले आहे. याविषयी सोशल मीडियातून पसरणाऱ्या बाबी तथ्यहीन आहे असे संजय राठोड म्हणाले.

By

Published : Feb 23, 2021, 10:25 AM IST

Published : Feb 23, 2021, 10:25 AM IST

Updated : Feb 23, 2021, 5:01 PM IST

संजय राठोड हे साडेअकरा वाजता पोहरादेवी येथे येणार
संजय राठोड हे साडेअकरा वाजता पोहरादेवी येथे येणार

यवतमाळ : वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणावर प्रथमच प्रतिक्रिया दिली. पूजा चव्हाणच्या मृत्युवर संपूर्ण बंजारा समाजाला दुःख झाले आहे. आम्ही चव्हाण कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. मात्र या मृत्युवरून सुरू असलेले राजकारण निंदनीय असल्याचे ते म्हणाले. मी ओबीसींचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. माझे राजकीय जीवन उध्वस्त करण्याचा घाणेरडा प्रयत्न या प्रकरणात झाल्याचे आपण पाहिले आहे. याविषयी सोशल मीडियातून पसरणाऱ्या बाबी तथ्यहीन आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईल असे ते म्हणाले. माझी, माझ्या कुटुंबाची, माझ्या समाजाची बदनामी करू नका ही विनंती करतो. माझ्या समाजाचे माझ्यावर प्रेम आहे. अनेक लोक मला भेटतात. ते माझ्यासोबत फोटो काढतात. कृपया मला राँगबॉक्समध्ये उभे करू नका असेही राठोड यावेळी म्हणाले.

पोहरादेवी येथे घेतले दर्शन

तत्पूर्वी संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे दर्शन घेतले. यावेळी राठोड यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जिल्ह्यात जमाव बंदी लागू आहे. मात्र राठोड यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात येथे दाखल झाले. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जिल्हा पोलिस प्रशासन सज्ज

सकाळी ते यवतमाळ येथील निवासस्थानातून पोहरागड देवस्थानाकडे जाण्याकरिता निघाले होते. ते रामरावबापू महाराज सेवालाल महाराज यांच्या समाधीचे दर्शन आणि महंतांसोबत चर्चाही करणार असल्याची माहिती यावेळी समोर आली होती. त्यांच्या या ताफ्यामध्ये केवळ एक खासगी वाहन आणि एक शासकीय वाहनाचाही समावेश होता.

शक्तिप्रदर्शन नाही..
संजय राठोड आल्यानंतर कोणते शक्तिप्रदर्शन होणार नसल्याचे यावेळी महंत जितेंद्र महाराज यांनी सांगितले होते. ते आल्यानंतर सेवालाल महाराज माता जगदंबा देवी यांचे दर्शन ते घेतील त्यानंतर महंतांसोबत ते बोलणार असल्याचे जितेंद्र महाराज तत्पूर्वी म्हणाले होते.

पोहरादेवी येथे होमहवन व पूजा

बंजारा समाजाच्या वतीने होमहवन

राठोड यांच्यावर आलेले संकट टळले पाहिजे यासाठी पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या वतीने विधिवत पद्धतीने होमहवन पूजा करण्यात आली.

संजय राठोड यांच्या स्वागतासाठी लेंगी नृत्य

संजय राठोड यांच्या स्वागतासाठी लेंगी नृत्य
संजय राठोड हे पोहरादेवीला दर्शनासाठी येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी बंजारा समाजातील काही लोक व समर्थक पारंपारिक पोषाखात परिधान करून लेंगी नृत्य केले. यावेळी संत सेवालाल महाराज की जय अशा घोषणाही देण्यात आल्या.

वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीला पोहोचले

दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार बैठक

संजय राठोड यवतमाळला दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनमध्ये कोरोना संदर्भात बैठक घेणार आहेत. या बैठकीला जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे उपस्थित राहणार आहे.

Last Updated : Feb 23, 2021, 5:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details