महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकरी बँकेच्या दालनात पोहोचले विष घेऊन, कर्ज वसुलीस मुदतवाढ मिळाल्याने शांत

आर्वीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कृषी विकास शाखेने शेतकऱ्यांवर थकीत असलेले कृषी कर्ज सक्तीची केली. यावेळी यंदा पीक न झाल्याने कृषी कर्ज थकले आहे. हफ्ते थकताच इतर कर्ज ज्यामध्ये गृहकर्ज, सोने तारण, ट्रॅक्टर इतर लोन हे नियमित भरत असताना सुद्धा त्यांना कृषी कर्जाचे थकबाकीदार दाखवत सक्तीची कर्जवसुली मोहिमेच्या नोटीस दिल्या आहेत.

शेतकरी बँकेच्या दालनात पोहोचले विष घेऊन

By

Published : Nov 5, 2019, 5:49 PM IST

वर्धा -आर्वी येथे स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेकडून सुरू असलेल्या सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप हे काही पदाधिकारी आणि शेतकऱ्यांसह विषारी औषध घेऊन बँकेत पोहोचले. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. मात्र, त्यानंतर नागपूर क्षेत्र सहाय्यक प्रबंधक अनिल साटोने यांनी चर्चा करून कर्जवसुलीला मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगितले. यामुळे प्रकरण चिघळण्याऐवजी थांबले.

शेतकरी बँकेच्या दालनात पोहोचले विष घेऊन

आर्वीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कृषी विकास शाखेने शेतकऱ्यांवर थकीत असलेले कृषी कर्ज सक्तीची केली. यावेळी यंदा पीक न झाल्याने कृषी कर्ज थकले आहे. हफ्ते थकताच इतर कर्ज ज्यामध्ये गृहकर्ज, सोने तारण, ट्रॅक्टर इतर लोन हे नियमित भरत असताना सुद्धा त्यांना कृषी कर्जाचे थकबाकीदार दाखवत सक्तीची कर्जवसुली मोहिमेच्या नोटीस दिल्या आहेत. दिवसातून एक फोन यांसह ३ नोटीस बजावण्यात आल्या असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे काहींनी धसका घेतला असून बँक आत्महत्येला प्रवृत्त करत असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.

सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांनी शेतजाऱ्यांसोबत जाऊन शेतकऱ्यांच्या परिस्थिती समजावून सांगितली. यावेळी अवकाळी पावसाने पीक हाताचे गेले असताना शेतकऱ्यांनी पैसे द्यायचे कुठून? असा सवाल केला. तसेच बँक कर्मचारी ग्राहक आणि बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील योग्य वागणूक देत नसल्याच्या तक्रारी साटोने यांना समजल्या. त्यांनी शाखा व्यवस्थापक, दीपक नदेश्वर, विकास अधिकारी भूषण गौरखेडे आणि सहाय्यक आशुतोष सोनी यांना समज दिली. तसेच शाखा व्यवस्थापकांनी दालनात लागलेले पडदे काढून थेट लक्ष ठेवल्यास अशा तक्रारी येणार नाही, असेही ते म्हणाले.

अशोक गावंडे यांची ६ एकर शेती आहे. त्यांच्यावर कृषी कर्ज होते. यांना घराचा लिलाव करण्याची धमकी नोटीसमधून देण्यात आली. त्यामुळे त्यांनी धसका घेतला. कृषी कर्ज थकले असले तरी गृह कर्ज नियमित भरत आहे. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक शेतात कुजले आहे. पिकांवर मुद्दल निघत नसताना कर्ज भरावे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पुढे करावे काय? अशी चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details