वर्धा- येथील हिंगणघाट तालुक्यातील शेगाव कुंड येथे बंदी असलेले HTBT बियाणे तसेच बिजी 3 नावाने प्रसिद्ध असलेले बियाण्याची पेरणी करण्यात आली आहे. या बियाण्यावर पर्यावरण कायदा, जीवनावश्यक कायदा आणि वस्तूंचा कायद्याअंतर्गत बंदी घातलेली आहे. मात्र हे बियाणे जनुकीय तंत्रज्ञाने विकसित असल्याने यावर होणारा एकरी खर्च कमी आहे. त्यामुळे हे बियाणे पेरण्यासाठी मान्यता द्यावी. तसेच शेतकऱ्याने शेतात काय पेरावे हा त्यांचा अधिकार आहे. या मागणीसाठी शेतकरी संघटनेने आंदोलन केले.
शेगाव कुंड हे शेतकरी संघटनेचे मजबूत संघटन असणारे गाव आहे. या गावातील शेतकरी संघटनेचे नेते मधुसूदन हरणे यांच्या शेतात हे बियाणे पेरणीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी या आंदोलनात गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यात महिला पुरुषांसह शेतकरी कुटुंबातील लहान मुलांचाही सहभाग होता.
संविनय कायदेभंग पद्धतीने केलेले हे आंदोलन करण्यात आले. कायद्याने बंदी असल्याने हे पेरणी करून गुन्हा आम्हाला मान्य आहे. हे बियाणे सहज उपलब्ध व्हावे, असलेली बंदी उठवावी, शेतकऱ्यांना शिक्षा देणारा कायद्यावर बंदी घालावी. यासाठी ५ वर्ष शिक्षा आणि १ लाखांचा दंड रद्द करण्यात यावा अशा मागणीही या संघटनेने केली.
शेतकऱ्यांना अडचणीत आणून त्यांना गरिबी कर्जबाजारी पानात आणून ठेवणे हे सर्व सरकारचे धोरण स्वातंत्रपूर्व काळापासून सुरू आहे. हे नवीन सरकार जरी रामाचे नाव घेऊन आले असेल तरी धोरण मात्र बदललेले नाही. दिवंगत शेतकऱ्यांचे नेते शरद जोशींनी दाखवलेला मार्गाप्रमाणे हे आंदोलन पुकारण्यात आले. जर कायदा जनतेच्या फायदाऐवजी विरोधात असेल तो कायदा तोडण्याचा अधिकार जनतेला आहे, असे त्यांचे मत त्यांचे होते.