महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापरीक्षा पोर्टल वाद.. पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षेला स्थगिती, मुख्यमंत्र्यांची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी प्रश्न मांडून याकडे लक्ष वेधले. या परीक्षा खासगी केंद्रवर घेऊ नये, त्यात मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे पुढे आले आहे. यापूर्वी झालेल्या गोंधळाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी सुचवले.

By

Published : Dec 18, 2019, 7:41 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर- शासकीय नोकऱ्यांच्या विविध पद भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्याचे काम केले जात होते. मात्र, या पोर्टलमध्ये गैरप्रकार होत असल्याचा जोरदार आरोप झाल्यानंतर महापोर्टलला स्थगिती देण्यात आली आहे. तर यावर त्रयस्त संस्थेकडून याची दोनदा चौकशी झाली आहे, तिसऱ्यांदा सुरू आहे. लवकरच अहवाल आला की सादर केला जाईल. तसेच पशुसंवर्धन भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे, असे अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.

हेही वाचा -डिसेंबरमध्ये चांगले लोक जन्माला येतात, प्रतिभाताईंच्या सत्कारावेळी पवारांचे वक्तव्य

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी प्रश्न मांडून याकडे लक्ष वेधले. या परीक्षा खासगी केंद्रवर घेऊ नये, त्यात मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे पुढे आले आहे. यापूर्वी झालेल्या गोंधळाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी सुचवले. यावर काँग्रेसचे सतेज पाटील यांनी ही लक्षवेधी सूचना मांडताना महापरीक्षा पोर्टल तत्काळ रद्द करण्याची मागणी केली. या पोर्टलमध्ये अनेक त्रुटी असून त्या दुरुस्त करत बसण्यापेक्षा कायमस्वरूपी रद्द करावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा -महापोर्टल घोटाळा 'व्यापम'पेक्षाही मोठा - जितेंद्र आव्हाड

पशुसंवर्धन विभागाच्या भरती प्रक्रियेस स्थगिती दिली आहे. कारण, 4 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, एकावेळी एवढे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील, एवढी या पोर्टलची क्षमता नाही. त्यामुळे या परिक्षेला स्थगिती देण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details