महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा नियोजन समितीतून दोन आमदारांची नियुक्ती रद्द; खासदार तडसांकडून आंदोलनाचा इशारा

दोन आमदारांच्या नावाने निघालेल्या पत्रामुळे लोकप्रतिनिधीनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. याविरोधात वेळप्रसंगी आंदोलन करू, असा इशारा खासदार रामदास तडस यांनी दिला. अशा प्रकारे सदस्यत्व रद्द करण्याता प्रकार म्हणजे त्यांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नाम निर्देशित सदस्य म्हणून आमदारांचे सदस्यत्व रद्द झाल्याने आता त्यांनी ग्रामपंचायत स्तराचे प्रश्न विधीमंडळात मांडायचे काय? असा सवाल तडस यांनी केलाय

By

Published : Jan 19, 2020, 10:26 AM IST

Updated : Jan 19, 2020, 10:40 AM IST

जिल्हा नियोजन समितीतून दोन आमदारांची नियुक्ती रद्
जिल्हा नियोजन समितीतून दोन आमदारांची नियुक्ती रद्

वर्धा- जिल्हा नियोजन समितीची बैठक येत्या 24 डिसेंबरला पार पडणार आहे. ही बैठक नवननियुक्त पालकमंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मात्र, नियोजित डीपीडीसीच्या बैठकीवरून एक गोंधळ समोर आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदावरून दोन नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती रद्द केल्याचे पत्र खासदार तडस यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर आणले आहे. यामध्ये केवळ आमदार पंकज भोयर आणि समीर कुणावर यांच्याच नावाचा समावेश आहे. असे असले तरी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी मात्र त्यांचे सदस्यत्व कायम असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे सध्या हा गोंधळ समोर आला आहे.

जिल्हा नियोजन समितीतून दोन आमदारांची नियुक्ती रद्द; खासदार तडसांकडून आंदोलनाचा इशारा
दोन आमदारांच्या नावाने निघालेल्या पत्रामुळे लोकप्रतिनिधीनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. याविरोधात वेळप्रसंगी आंदोलन करू, असा इशारा खासदार रामदास तडस यांनी दिला. अशा प्रकारे सदस्यत्व रद्द करण्याता प्रकार म्हणजे त्यांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नाम निर्देशित सदस्य म्हणून आमदारांचे सदस्यत्व रद्द झाल्याने आता त्यांनी ग्रामपंचायत स्तराचे प्रश्न विधीमंडळात मांडायचे काय? असा सवाल तडस यांनी केलाय. तसेच येत्या २४ जानेवारीला आयोजित नियोजन समितीच्या बैठकीला जायचे की नाही, हा देखील प्रश्नच असल्याचे मत आमदार डॉ.पंंकज भोयर आणि समीर कुणावार यांनी व्यक्त केले.शासनाच्या निर्णयानुसार नियोजन समिती अंतर्गत असलेल्या कार्यकारी समितीत पालकमंत्र्यांनी निवड केलेल्या दोन नामनिर्देशीत सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. हे दोन सदस्य आमदार समीर कुणावर आणि डॉ पंकज भोयर होते. हे सदस्यत्व रद्द झाल्याने पालकमंत्र्यांच्या आदेशाने नव्याने सदस्यांची समितीवर निवड केली जाईल. दोन्ही आमदार नियोजन समितीचे सदस्य आहेतच. त्यांचे नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून ते कायम आहेत. यामुळे आमदारांना नियोजन समितीच्या बैठकीचे निमंत्रण देणारे पत्र पाठविले असल्याचेही नियोजन विकास अधिकारी अरविंद टेंभूर्णे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. आता मात्र नियोजन अधिकाऱ्यांच्या या उत्तराने पुन्हा प्रश्न निर्माण होत आहे. खासदार तडस हे आंदोलन करणार का? आमदारांच्या हक्कावर या पत्राने खरंच गदा आलीय का? या प्रश्नांच्या उत्तरांचे 24 जानेवारीला पालकमंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या नियोजन समितीच्या बैठकीतच मिळेल.
Last Updated : Jan 19, 2020, 10:40 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details