महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात भाजीच्या कॅरेटमधून दारुची वाहतूक; दुचाकी चालकाला अटक

नागपूर-चंद्रपूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतुकीसाठी  नव-नवीन शकली लढवल्या जातात. यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो. भाजीपाला कॅरेट मोपेडला बांधून डोक्याला दुपट्टा बांधून जात असलेल्या व्यक्तीवर डीबी पथकाला संशय आला.

By

Published : Sep 25, 2019, 7:20 PM IST

Updated : Sep 25, 2019, 7:55 PM IST

भाजीच्या कॅरेटमधून भाजीसोबत दारुची वाहतूक

वर्धा - जिल्ह्यात दारुबंदी असल्याने अवैधरित्या विक्री आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. यासाठी वाहतूक आणि विक्री करण्यासाठी नव-नवीन पद्धतीचा अवलंब केला जातो. बंदी असल्याने दारुची वाहतूक करण्यासाठी वेगवेगळ्या शकली लढवल्या जातात. समुद्रपूरच्या डीबी पथकाने बुधवारी जाम (चौरस्ता) येथे भाजीच्या कॅरेटमध्ये भाजीखाली लपवून दारुची वाहतूक करताना एकाला अटक केली. मनोज मेघानी (वय 34) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो नागपुरातील जरीपटका भागातील रहिवासी आहे.

भाजीच्या कॅरेटमधून भाजीसोबत दारुची वाहतूक

हेही वाचा-अजित पवारांसह अन्य नेत्यांवर ईडीची कारवाई कायदेशीरच - माधव भांडारी

नागपूर-चंद्रपूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतुकीसाठी नव-नवीन शकली लढवल्या जातात. यातच वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो. भाजीपाला कॅरेट मोपेडला बांधून डोक्याला दुपट्टा बांधून जात असलेल्या व्यक्तीवर डीबी पथकाला संशय आला. जाम फाट्यावरुन चंद्रपूरच्या दिशेने जाताना त्याला ताब्यात घेत चौकशी केली. या व्यक्तीकडे भाजीपाला आणि त्याखाली विदेशी दारुच्या बॉटल आढळून आल्या. तसेच मोपेड वाहनाच्या सीटखाली तपासणी केली असता त्यामध्येही दारुच्या बॉटल आढळून आल्या. यावेळी समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाच्या अरविंद येनूरकर यांनी या व्यक्तीला अटक केली. त्याच्यावर दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मेघानीकडून ७२ विदेशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या कारवाईत समुद्रपूर पोलिसांनी दुचाकीसह एकूण ८८२०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.

Last Updated : Sep 25, 2019, 7:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details