महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महात्मा गांधींच्या ग्रामोद्योग संकल्पनेला प्रत्यक्षात चालना देऊ - सुनिल केदार

महात्मा गांधींच्या दिडशेव्या जयंती वर्षाच्या निमित्याने त्यांच्या विचारावर आधारित असणाऱ्या ग्रामोद्योगांना प्रत्यक्षात चालना देऊन रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्थाच्या मदतीने प्रशिक्षण देऊन, कार्यशाळा आयोजित करून प्रत्यक्षात उद्योग उभारून चालना दिली जाणार आहे. गांधीजींचे विचाराचार ग्रामउद्योगांना प्रत्यक्षात चालना देऊ असे मत पालकमंत्री तथा दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले.

Sunil Kedar
सुनिल केदार

By

Published : Jul 24, 2020, 8:58 PM IST

वर्धा - यंदा महात्मा गांधींचे दिडशेवे जयंती वर्ष आहे. यानिमित्याने त्यांच्या विचारावर आधारित असणाऱ्या ग्रामोद्योगांना प्रत्यक्षात चालना देऊन रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्थाच्या मदतीने प्रशिक्षण देऊन, कार्यशाळा आयोजित करून प्रत्यक्षात उद्योग उभारून चालना दिली जाणार आहे. गांधीजींचे विचाराचार ग्रामउद्योगांना प्रत्यक्षात चालना देऊ, असे मत पालकमंत्री तथा दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विभागाच्या बैठकीत अहवाल घेण्यासाठी व गांधीजींच्या दिडशेवी जयंती साजरी करण्यासंदर्भात बैठक घेण्यासाठी आले होते.

दीडशे गाव-दीडशे युवक- दीडशे उद्योग....

पालकमंत्री सुनील केदार यांनी बैठकीत महात्मा गांधींच्या संबंधित विविध संस्थेच्या प्रतिनिधी सोबत बैठकीत चर्चा केली. यात दिडशेवी जयंती साजरी करण्यासाठी नव नवीन संकल्पनांवर चर्चा केली. दत्तपुर येथील ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र आणि सर्व सेवा संघाच्या वतीने दीडशे गावांमध्ये दीडशे युवकांसाठी दीडशे उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. हे उद्योग स्वदेशीवर आधारित असणार आहेत. स्वदेशी मालाचा जास्तीत जास्त वापर प्रोत्साहन देण्यासाठी ही संकल्पना राबवायची आहे. यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाशी समन्वय साधून युवकांना त्या पद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात यावे, असे पालकमंत्री यांनी सांगितले. याशिवाय महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, महिलांसोबत काम करणाऱ्या सामाजिक संस्था यांचे संग्रहालया सोबत समन्वय करून एक दिवसाचे वर्कशॉप आयोजित करण्यात यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने महात्मा गांधी यांच्या विचारावर आंतरराष्ट्रीय क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचे संमेलन आयोजित करण्यासंदर्भात सांगितले. तसेच महात्मा गांधी यांच्या विचारावर वर्ध्यात काम करणाऱ्या सर्व संस्थांनी दीडशेव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महात्मा गांधींचे विचार आणि त्यांचे ग्रामोद्योगाची संकल्पना सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या संकल्पना चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी सर्व मिळून काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी सर्व संस्थानी शासन, प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची हमी दिली. या बैठकीला आमदार रणजित कांबळे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे,सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी एन प्रभू, सचिव मुकुंद मस्के, सर्व सेवा संघाचे प्रशांत गुजर जमनालाल बजाज फाउंडेशनचे जीवन कुलबांते, एम गिरीचे डॉ. व्यंकट राव, नई तालीमचे शिव चरणसिंग ठाकूर, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे सोहम पंड्या, बजाज वाडीचे संजय कुमार, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे बी. एस गर्ग, राष्ट्रभाषा प्रचार समितीचे डॉक्टर हेमचंद्र वैद्य, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे डॉ. कादर नवाज खान, प्रोफेसर मनोज कुमार इत्यादी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details