वर्धा - आर्वी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधिताने रुग्णालयातून पळ काढून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आष्टी तालुक्यातील कोरोनाबाधित गेल्या तीन दिवसांपासून उपचारासाठी आर्वी उपजिल्हा रुग्णालयात भरती होता. तो काल सायंकाळी रुग्णालयातून पळून गेला. शोध घेतला असता त्याचा मृतदेह शहराच्या बाहेर एका विहिरीत आढळला. आज दुपारी त्याचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला.
माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी हेही वाचा -वर्ध्यात ऑक्सिजन निर्मितीसाठी चाचपणी; राज्य शासनाच्या चमुकडून पाहणी
विहिरीत आढळला रुग्णाचा मृतदेह
उपजिल्हा रुग्णालयातून कोरोनाबाधित पळून गेल्याचे समजताच चांगलीच खळबळ माजली. या बाबतची माहिती रुग्णालय प्रशासनाने आर्वी पोलिसांना दिली. यावेळी शोध घेतला असता त्याच्या मोबाईल लोकेशनवरून परिसरात शोध घेण्यात आला. शहराबाहेर दोन किलोमीटर अंतरावर एका विहिरीत रुग्णाचा मृतदेह आढळला. हा मृतदेह अथक परिश्रमानंतर क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून आर्वी पोलीस तपास करीत आहे.
हेही वाचा -वर्धा, कुंभमेळ्याहून परतणाऱ्यांना कोविड चाचणी अनिर्वाय; जिल्हा प्रशासनाचा आदेश