वर्धा - शहरातील कारागृहात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. पाण्याची गरज भागवायला येथे एक नव्हे तर ६ विहिरी आहेत. मात्र, गेल्या ५ दशकांमध्ये यंदा सहाही विहिरींनी तळ गाठला आहे.
कैद्यांना रोज पिण्यासाठी, स्वछतेसाठी पाणी लागत असते. सोबतच अन्न शिजवायला सुद्धा पाणी पाहिजे. सुरुवातीला नगरपरिषदेतून पाणी पुरवठा होत होता. मात्र, दररोजच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन १६ हजार लिटर ते १७ हजार लिटर नळाने भागवली जाऊ शकत नाही. मात्र, शहरात ४ ते ५ दिवसांनी पाणी पुरवठा होत होता. त्यामुळे कारागृहाला पाणीपुरवठा करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना विनंती करण्यात आली. त्यानंतर कारागृहासाठी पोलीस मुख्यालयातील विहिरीतून टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. आता नगर परिषदेकडून दिवसभरात ११ हजार लिटरच्या घरात पाणी पुरवले जात असल्याचे कारागृह अधीक्षक अनिल खामकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.