वर्धा : कॅनॉलमध्ये आढळला मृत बिबट्या, उपासमारीने मृत्यू झाल्याची शक्यता
सेलू तालुक्यातील केळझर परिसरात बंद असलेल्या महाराष्ट्र एक्सप्लोजीव कंपनीच्या परिसरात मृतावस्थेत बिबट्या आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार बिबट्याचा मृत्यू एक दिवसापूर्वी झाला असावा. शवविच्छेदन अहवालानुसार बिबट्याचा मृत्यू उपासमारीने झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वर्धा - सेलू तालुक्यातील केळझर परिसरात बंद असलेल्या महाराष्ट्र एक्सप्लोजीव कंपनीच्या परिसरात मृतावस्थेत बिबट्या आढळून आला. बकरी चारणाऱ्या गुराख्यास हे दिसल्याने घटना उघडकीस आली. रविवारी दुपारी वनविभाग घटनास्थळी दाखल झाला.
केळझरच्या भागात अनेक वर्षांपासून महाराष्ट्र एक्सप्लोसिव्ह कंपनी बंद आहे. सेलडोहकडे जाणाऱ्या कालव्यात बिबट मृतावस्थेत पडून होता. नामदेव चचाणे चराईसाठी जात असताना कालव्यात आढळून आला. पाण्यात तरंगत असल्याची माहिती कंपनीचे सुरक्षा रक्षकाला सांगितले. त्याने वनविगाशी संपर्क साधून माहिती दिली. यावेळी एक दिवसांपूर्वी मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.