वर्धा - देवळी येथील एस.एस.एन.जे. महाविद्यालयातल नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि 71 वा राष्ट्रीय छात्र सेना वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मैदानावर संचलन केले. पाहुण्यांना शिस्तीचे प्रात्यक्षिके दाखवत विद्यार्थ्यांनी एनसीसीच्या अनुशासनाची ओळख करून दिली.
एस.एस.एन.जे. महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा हेही वाचा... ...म्हणून मनसेने झेंडा बदलला, राज ठाकरेंचा खुलासा
या कार्यक्रमाला समादेशक अधिकारी कर्नल डी. व्ही भास्कर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. 'आज देशाला, देशप्रेम असणाऱ्या युवा पिढीची गरज आहे. एनसीसीच्या माध्यमातून अनुशासित आदर्श व्यक्तिमत्व पुढे येत आहे', याबाबत आनंद होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... नरेंद्र मोदी घेणार ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ २०२० च्या विजेत्या मुलांची भेट
कार्यक्रमात सैन्य दलात भरती झालेल्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. संकेत काळे आणि अनिकेत डुकरे, असे या दोन्ही विद्यार्थ्यांची नावे आहेत. यासह एनसीसी प्रशिक्षक हवालदार अमनदीप सुरजूसे, ज्ञानेश्वर गंडे यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच बेस्ट कॅडेट म्हणून सार्जन्ट राजेश सुरजूसे, वैभव गायकवाड, रसिका तुपे, पल्लवी बुरबुरे, आरती महल्ले, रणजित येल्लोरे यांचा सत्कार करण्यात आला.
हेही वाचा... 'मनसेच्या हिंदुत्वामागे शरद पवार, मनसे-भाजप एकत्र येणार नाही'
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय, यशवंत ग्रामिण संस्थेचे सचिव प्रकाश ढगे, प्रशासकीय अधिकरी कर्नल गॅस बेग, एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, गणेश शेंडे, प्रहार संस्थेचे सचिव संतोष तुरक आणि नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.