महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फेसबुकवर पोस्ट लिहून तरुणाची आत्महत्या

'मी आयुष्याला कंटाळून जीव देत आहे. माझे काही चुकले असेल तर माफ करा' असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले होते. आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असेही त्याने पोस्टमध्ये नमूद केले आहे.

suicide
फेसबुकवर पोस्ट लिहून तरुणाची आत्महत्या

By

Published : Jan 21, 2020, 5:07 PM IST

Updated : Jan 21, 2020, 5:24 PM IST

ठाणे- फेसबुकवर पोस्ट करून राहत्या घरात गळफासाने तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी ठाण्यात घडली. मंदार भोईर (रा. सिनेगॉग चौक, टेंभीनाका) असे मृताचे नाव आहे. आयुष्याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे मंदारने घटनेपूर्वी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सोशल मीडियाच्या जगात मंदार एकटा पडला होता, मित्राने सांगितली व्यथा

हेही वाचा - विकृतीचा कळस! चंद्रपुरात तरुणावर 14 जणांचा अनैसर्गिक अत्याचार, तरुणाची आत्महत्या

या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंदार हा गेल्या अनेक दिवसांपासून तणावात होता. सोमवारी पहाटे कुटुंबीय झोपेत असताना घरातील स्वच्छतागृहात त्याने गळफास घेतला. कुटुंबीय उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा - इंडिगो कंपनीच्या विमानाचे टेकऑफ रद्द; संतापलेल्या प्रवाशांनी मॅनेजरला केली धक्काबुक्की

मंदार याने आत्महत्येपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. 'मी आयुष्याला कंटाळून जीव देत आहे. माझे काही चुकले असेल तर माफ करा' असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले होते. आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असेही त्याने पोस्टमध्ये नमूद केले आहे. मंदार हा महापालिकेमध्ये नोकरी करायचा. गेल्या काही महिन्यांपासून तो कामावर जात नव्हता, अशी माहिती त्याच्या मित्र परिवाराने दिली.

Last Updated : Jan 21, 2020, 5:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details