महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिंवडीमधील क्लब चालकाच्या उसनवारीच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

गणेशने काही दिवसांपूर्वी त्याच्याच परिसरात राहणाऱ्या कॅरम क्लब चालक अन्नू उर्फ अन्वर फय्याज शेख याच्याकडून ५ हजार रुपये उधारीवर घेतले होते. हे पैसे परत घेण्यासाठी अन्नूने गणेशच्या मागे तगादा लावला होता.

मृत गणेश अंबादास गाजुल

By

Published : Jul 4, 2019, 9:56 PM IST

ठाणे- क्लब चालकाकडून घेतलेल्या उसनवारीच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. भिंवडी शहरातील केजीएन चौकातील नवी वस्ती परिसरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून गणेश अंबादास गाजुल (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

गणेशने काही दिवसांपूर्वी त्याच्याच परिसरात राहणाऱ्या कॅरम क्लब चालक अन्नू उर्फ अन्वर फय्याज शेख याच्याकडून ५ हजार रुपये उधारीवर घेतले होते. हे पैसे परत घेण्यासाठी अन्नूने गणेशच्या मागे तगादा लावला होता. तसेच त्याला मारहाण देखील केली होती. सायंकाळपर्यंत पैसे परत न केल्यास पुन्हा बेदम मारण्याची धमकी दिली. त्याला घाबरून गणेशने बुधवारी सायंकाळी घरातील लोखंडी सळ्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

गणेशच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांनी तत्काळ भिवंडी शहर पोलीस ठाणे गाठले. तसेच धमकी देणाऱ्या अन्नू विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अन्नूविरोधात गुन्हा दाखल केला. आज त्याला न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details