ठाणे- टेमघर जलशुध्दीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मर मधून गळती होत आहे. याची दुरुस्ती तातडीने करण्याचे काम मे.स्टेम वॉटर डिस्ट्री अॅण्ड इन्फा कंपनी यांच्यामार्फत केले जाणार आहे. शुक्रवार 1 मे रोजी हे काम करण्यात येणार असल्यामुळे ठाण्याचा पाणीपुरवठा काही वेळ बंद राहणार आहे.
हेही वाचा-पुणे शहरात आज नवीन 75 कोरोनाबाधित रुग्ण आढळले - डॉ. दीपक म्हैसेकर
ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीच्या कामासाठी शुक्रवारी 1 मे रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 6 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या दिवशी ठाणे महापालिकेस होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे ठाणे शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, कासारवडवली, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, सिध्देश्वर, जॉन्सन, इटर्निटी, इंदिरानगर, समतानगर, लोकमान्यनगर, किसननगर व श्रीनगर इत्यादी विभागाचा पाणी पुरवठा सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
यामुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा यादरम्यान काटकसरीने वापर करुन पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.