महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Corona : उल्हासनगरात १६ जणांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, एकूण बाधितांची संख्या ११९ वर

उल्हासनगरात रविवारी दिवसभरात १६ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे उल्हासनगर मधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ११९ वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह आढळून आलेले आठ जण हे उल्हासनगर कॅम्प ३ मधील शांतीनगर परिसरातील ब्राम्हणपाडा येथे राहणारे आहेत. यामुळे ब्राम्हणपाडा येथील कोरोनाबाधितांचा आकडा ३० च्या पुढे गेला आहे.

By

Published : May 18, 2020, 11:40 AM IST

Ulhasnagar 16 new patients  Report corona positive
उल्हासनगरात १६ जणांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

उल्हासनगर (ठाणे) - कोरोना चाचणीच्या अहवालानुसार रविवारी उल्हासनगरच्या ११ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र त्यानंतर खासगी प्रयोगशाळेकडून आलेल्या एका चाचणी अहवालात पाच जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. यामुळे रविवारी दिवसभरात १६ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे उल्हासनगर मधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ११९ वर पोहोचली आहे.

विशेष म्हणजे पॉझिटिव्ह आढळून आलेले आठ जण हे उल्हासनगर कॅम्प ३ मधील शांतीनगर परिसरातील ब्राम्हणपाडा येथे राहणारे आहेत. यामुळे ब्राम्हणपाडा येथील कोरोनाबाधितांचा आकडा ३० च्या पुढे गेला आहे. शहरातील दुसरा हॉटस्पॉट असलेल्या उल्हासनगर कॅम्प ३ मधील सम्राट अशोक नगरमध्ये गेल्या तीन दिवसात एकही व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली नाही.

या परिसरातील उपचार घेत असलेले १५ रुग्ण हे कोरोना मुक्त झालेले असून त्यांना लवकरच घरी सोडण्यात येईल. उर्वरित तीन जणांपैकी एक व्यक्ती हि चौपडा कोर्ट परिसरातील आहे. पंधरा दिवसांपूर्वी स्टॉक एक्सचेंजमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. तो राहत असलेल्या इमारती शेजारच्या सदनिकेत राहणाऱ्या कुटुंबातील चार जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

उल्हासनगर कॅम्प १ च्या सेंच्युरी रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या एका व्यक्तीची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. ही व्यक्ती खेमानी परिसरात राहणारी आहे. गोलमैदान परिसरातील नऊ रहिवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. असे असताना नागरिक या परिसरात विनाकारण फिरताना दिसतात. तसेच सायंकाळी वॉक करताना दिसतात, हे असेच चालू राहिले तर या परिसरातील कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details