ठाणे - कोरोनाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र येत्या 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली. तसेच मुंबईतील रेल्वे, खासगी बसेस एसटी सेवा बंद केल्या आहेत.
COVID-19: ठाण्यात 144 चे उल्लंघन.. आनंद नगर चेक नाक्यावर वाहतूक कोंडी
नागरिकांनी 144 कलम तोडून मुंबईच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आनंद नगर चेक नाका येथे पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. अनावश्यक गाड्यांना पोलीस परत पाठवत आहेत. सरकारी कर्मचारी, डॉक्टर, बँक कर्मचारी असे लोकांनाच मुंबईच्या दिशेने ओळखपत्र दाखवूनच पोलीस सोडत आहे. त्यामुळे याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
आनंद नगर चेक नाक्यावर वाहतूक कोंडी
हेही वाचा-कोरोना अपडेट : राज्यात पहाटे पाच वाजेपर्यंत जनता कर्फ्यू वाढवला - आरोग्यमंत्री
मात्र, नागरिकांनी 144 कलम तोडून मुंबईच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आनंद नगर चेक नाका येथे पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. अनावश्यक गाड्यांना पोलीस परत पाठवत आहेत. सरकारी कर्मचारी, डॉक्टर, बँक कर्मचारी असे लोकांनाच मुंबईच्या दिशेने ओळखपत्र दाखवूनच पोलीस सोडत आहे. त्यामुळे याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.