महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 6, 2021, 6:31 PM IST

Updated : Apr 6, 2021, 7:48 PM IST

ETV Bharat / state

मिनी लॉकडाऊन विरोधात उल्हासनगरातील शेकडो व्यापारी रस्त्यावर

उल्हासनगर महापालिका कर्मचारी व पोलिसांनी सोमवारी रात्री ८ नंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद राहणार असल्याची घोषणा केल्यानंतर आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास व्यापारी व पोलीस आमने-सामने आले होते.

व्यापारी वर्ग
व्यापारी वर्ग

ठाणे - राज्यात वाढत्या कोरोनावर आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आठवड्यातील ५ दिवस कडक निर्बंध आणि शनिवार- रविवार लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. सरकारने मिनी लॉकडाऊनचे गाजर दाखवून व्यापारी वर्गाची फसवणूक केली असल्याचा आरोप व्यापारी संघटनेने केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात उल्हासनगरमधील व्यापारी वर्ग आक्रमक झाला आहे. लॉकडाऊनमुळे हजारो लोकांचा रोजगार गेल्याचे सांगत रसत्यावर उतरत व्यापारी वर्गाने मिनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे.

मिनी लॉकडाऊन विरोधात उल्हासनगरातील शेकडो व्यापारी रस्त्यावर

हेही वााचा -कथित 100 कोटी वसुलीप्रकरणी सीबीआयने मागवली कागदपत्रे

शासनाच्या निर्णयाचा विरोध
देशात औधोगिक शहर म्हणून उल्हासनगराचे नावलौकिक आहे. उल्हासनगरमधील गजानन मार्केट कपड्यासाठी प्रसिद्ध असून फर्निचर, बॅग, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तूला मोठी मागणी आहे. अशा औद्योगिक शहरातील दुकाने बंद राहिल्यास दुकानदारासह दुकानामध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांवर मिनी लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार असल्याचा आरोप युटीए व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी केली आहे.

व्यापारी व पोलीस आमने-सामने
उल्हासनगर महापालिका कर्मचारी व पोलिसांनी सोमवारी रात्री ८ नंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद राहणार असल्याची घोषणा केल्यानंतर आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास व्यापारी व पोलीस आमने-सामने आले होते. अखेर पोलीस प्रशासन व महापालिका अधिकाऱ्यांनी व्यापारी नेत्यासोबत चर्चा करून शासनाचा निर्णय अंतिम असल्याचे सांगून सहकार्य करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवड्यातील ५ दिवस कडक निर्बंध तर शनिवार-रविवारी असे दोन दिवस कडक लॉकडाऊन करणार, असे व्यापाऱ्यांनी गृहीत धरले होते. मात्र, ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन जारी केला असून व्यापारी व दुकानात काम करणाऱ्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची टीका व्यापारी संघटनेकडून केली जात आहे.

हेही वााचा -मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार - गृहमंत्री वळसे पाटील

Last Updated : Apr 6, 2021, 7:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details