नवी मुंबई- कृषी उत्पन्न बाजार समिती आज पूर्णपणे बाजार बंद असल्यामुळे शुकशुकाट पाहायला मिळाला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून गुरुवारी व रविवारी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. या दरम्यान बाजार आवारात पूर्णपणे स्वच्छता करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही काळजी घेण्यात येत असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट हेही वाचा -कोरोना विरोधी लढ्यात पोलिसांचाही सक्रीय सहभाग; ठाणे पोलीस जनजागृतीसाठी रस्त्यावर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मार्चपर्यंत भाजी व फळ मार्केट दर गुरुवारी व रविवारी पूर्णपणे बंद करून मार्केटची स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन 50 ते 60 टन कचरा निर्माण होत असतो. यामधील जवळपास 80 टक्के कचरा भाजी व फळ मार्केटमध्ये तयार होत असतो. येथील 5 मार्केटमध्ये व्यापारी, माथाडी, वाहतूकदार व इतर मिळून जवळपास 1 लाख नागरिक काम करतात. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत.
हेही वाचा -ठाण्यात चिकन सेंटर चालकाला सुरीचा धाक दाखवून लुटले