ठाणे - कल्याण डोंबिवलीत आज ३१ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे, तर आजच्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेकडील चाळ - झोपडीत राहणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक असल्याने प्रशासनाची चिंता वाढल्याचे दिसून आले आहे.
कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे ३१ नवे रुग्ण; चाळ-झोपडीत कोरोनाचा शिरकाव
कल्याण डोंबिवलीत आज ३१ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले. आज नव्याने आढळून आलेल्या रुग्णांची नोंद पाहता कोरोना महापालिका हद्दीतील बाधितांचा आकडा सव्वा नऊशे पेक्षा अधिकवर जाऊन पोहोचला आहे, तर आतापर्यंत २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज नव्याने आढळून आलेल्या रुग्णांची नोंद पाहता कोरोना महापालिका हद्दीतील बाधितांचा आकडा सव्वा नऊशे पेक्षा अधिकवर जाऊन पोहोचला आहे, तर आतापर्यंत २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ३२६ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर सध्याच्या स्थितीत ५८९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये २ अल्पवयीन मुलाचा समावेश आहे, तर आजही रुग्णांमध्ये सर्वाधिक बाधित रुग्ण कल्याण पूर्वेत चाळीत व झोपडीत राहणारे रुग्ण असून आज ३१ रुग्णांपैकी १७ कोरोनाबाधित रुग्ण या भागात राहणारे आहेत, तर डोंबिवली परिसरात ७ रुग्ण आढळून आले. कल्याण पश्चिम परिसरातही ७ रुग्ण आढळून आले. मात्र, इतर परिसराच्या मानाने सर्वात कमी रुग्णांची संख्या कल्याण पश्चिममध्ये आहे. मात्र, डोंबिवली पूर्व परिसरातही बाधित रुग्णांच्या संपर्क येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.