महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या ३४ पोलिसांचे रिपोर्ट निगेटिव्ह;बदलापुरात ३ कोरोनाबाधितांची भर

अंबरनाथ पश्चिम भागातील सर्वोदय नगर येथील बाधित पोलीस कमर्चारी अंबरनाथ पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या संपर्कात आल्याने अंबरनाथ पोलीस ठाण्यातील एक पोलीस कमर्चारी कोरोनाबाधित झाला होता.

corona
कोरोना

By

Published : May 8, 2020, 12:58 PM IST

ठाणे-अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. तो कर्मचारी इतरही पोलिसांच्या संपर्कात आल्याने त्या पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली . त्यामध्ये ३४ पोलिसांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. मात्र बदलापुरात तीन कोरोना बाधित रुग्ण नव्याने आढळून आल्याने रुग्णांची संख्या ४५ वर गेली आहे.

अंबरनाथ पश्चिम भागातील सर्वोदय नगर येथील बाधित पोलीस कमर्चारी अंबरनाथ पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या संपर्कात आल्याने अंबरनाथ पोलीस ठाण्यातील एक पोलीस कमर्चारी कोरोनाबाधित झाला होता. त्यामुळे अंबरनाथ पोलीस ठाण्यातील ८९ पोलिस कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील ३४ पोलीस कर्मचाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीत आणखीन तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश झाला आहे. यातील दोन पोलीस कमर्चारी असून एक मुंबई महानगरपालिकेतील सफाई कमर्चारी आहे. या तिघांवर मुंबई आणि उल्हासनगर येथे उपचार सुरू असल्याची माहिती कुळगांव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

अन्य दोन जणांचे अहवाल बदलापूर नगरपालिकेला प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले आहेत. तर आणखी दोन जणांचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे. दरम्यान, कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ३० जणांना ठेवण्यात आल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे. बदलापूर आतापर्यंत एकूण ४५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यातील २१ जण बरे झाले आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. उर्वरित २० जणांवर मुंबई, ठाणे आणि उल्हासनगर येथे उपचार करण्यात येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details