महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चांद्रयान मोहिमेचे यश ही भारताची ऐतिहासिक कामगिरी - दा. कृ. सोमण

अवघ्या काही तासातच भारताचे चांद्रयाण - २ हे चंद्रावर उतरणार आहे. देशासाठी ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे मत खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले आहे.

By

Published : Sep 7, 2019, 1:43 AM IST

दा. कृ. सोमण

ठाणे - अवघ्या काही तासातच भारताचे चांद्रयाण - २ हे चंद्रावर उतरणार आहे. देशासाठी ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे मत खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले आहे. दक्षिण ध्रवावर यशस्वी यान उतरणारा भारत जगातील पहिलाच देश ठरणार आहे. त्यामुळे देशासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे सोमण म्हणाले.

GSLVMKII या रॉकेटची यशस्वी कामगिरी, सॉफ्ट लॅडींग करणारा भारत हा चौथा देश आहे. लँडर व रोवर हे सौर ऊर्जेवर कार्य करणार आहेत. चंद्रावरचा दिवस हा पृथ्वीवरच्या चौदा दिवसांचा असतो. 3 विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यावर त्यातून प्रज्ञान रोवर बाहेर पडेल. लँडरवर 4 उपकरणे, रोवरवर 2 उपकरणे आहेत. 500 मीटरमध्ये रोवर फिरेल, त्यानंतर ते संशोधन करणार असल्याची माहिती सोमण यांनी दिली.

दा. कृ. सोमण

लँडर चंद्रावर उतरणे महत्वाचे आहे. तसेच सॉफ्ट लँडींग आणि रोवर बाहेर पडून कार्य करणे महत्वाचे आहे. यामध्ये आपल्याला यश मिळेल असेही सोमण म्हणाले.

अशी कामगिरी करणार भारत चौथा देश
चंद्राच्या पृष्ठावर सॉफ्ट लँडिंग करणारा, त्याच्या भूरचनेचा, अंतर्गत गर्भाचा आणि वातावरणाचा अभ्यास करणारा भारत चौथा देश झाला आहे. यापूर्वी अशी कामगिरी रशिया, अमेरिका आणि चीन यांनी केली आहे. मानवाला दीर्घकाळ फायदेशीर ठरेल, अशा गोष्टींचा अभ्यास या मोहिमेत करण्याचा प्रमुख उद्देश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details