ठाणे -राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना आज (रविवारी) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी रुग्णालयातील नर्स आणि डाॅक्टर यांनी एकनाथ शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना निरोप दिला.
मंत्री एकनाथ शिंदे यांना 24 सप्टेंबरला कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रुग्णालयात असताना कोणत्याही प्रकारची लोकोपयोगी कामे आपल्यामुळे अडून राहू नये, म्हणून त्यांनी रुग्णालयातूनच कामाला सुरुवात केली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच काही कागदपत्रे हातावेगळी करून स्वाक्षऱ्या केल्या. आपली तब्येत सुधारत असून आपण लवकरच परत जनसेवेकरिता रुजू होऊ, असेही ते म्हणाले होते.