महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत पत्र्यांच्या खोल्यांना भीषण आग; १० कुटुंबाचा संसार जळून खाक

भिंवडी शहरातील फातिमानगर परिसरात शुक्रवारी रात्री अग्नितांडवाची घटना घडली. यामध्ये १० कुटुंबांचे संसार जळून खाक झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

bhiwandi
भिवंडीत पत्र्यांच्या खोल्यांना भीषण आग

By

Published : Dec 26, 2020, 10:49 AM IST

Updated : Dec 26, 2020, 10:57 AM IST

ठाणे - भिवंडीत अग्नितांडवाच्या घटना सुरूच असून शहरात पुन्हा भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यावेळी भिवंडी शहरातील फातिमा नगर परिसरात असलेल्या पत्र्यांच्या खोल्यांना भीषण आग लागली. या आगीत १० पत्र्याच्या खोल्या जळून खाक झाल्याने १० कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. सुदौवाने खोल्यात राहणारे ५० ते ६० रहिवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात नागरिक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. त्यामुळे मोठी मुनष्यहानी टळली आहे. आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही.

भिवंडीत पत्र्यांच्या खोल्यांना भीषण आग
शेजारच्या खोलीत धुराचे लोट शिरल्याने रहिवाशी बचावले-

शहरातील फातिमानगर परिसर दाट रहिवासी परिसर आहे. याठिकाणी लोखंडी पत्र्यांच्या खोल्या मोठ्या प्रमाणात आहेत. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जेवण करून फातिमा नगरातील नागरीक झोपी गेले होते. त्यावेळी अचानक मध्यरात्रीच्या सुमारास येथील एका बंद पत्र्याच्या खोलीत भीषण आग लागली. या आगीच्या धुराचा लोट शेजारच्या खोलीत शिरल्याने रहिवाशी खडबडून जागे झाले. आग लागल्याचे समजल्यानंतर परिसरात आरडाओरडा सुरू झाला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

जीवितहानी नाही, मात्र संसाराची राखरांगोळी-

अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. रांगेत असलेल्या पत्र्यांच्या खोल्यांना भीषण आग लागली होती. घरातील नागरिकांना कसेबसे सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जवळपास पन्नास ते साठ नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात नागरिकांना तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र यामध्ये घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवले आहे.


Last Updated : Dec 26, 2020, 10:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details