ठाणे :जगभरात खरेदी विक्रीवर वस्तूची चांगली किंमत मिळत असलेल्या OLX ॲपवर भिवंडीतील एका ट्रान्सपोर्ट व्यवसायिकानं त्यांचा जुना टेम्पो विक्रीसाठी अपलोड केला होता. मात्र, चार भामट्यांनी आपसात संगनमतानं तो खरेदी केल्याचं भासवून टेम्पो पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चौघांही अज्ञात भामट्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेम्पो पळवला : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील हजरत अली अब्दुल अजीज खान (वय, 32) यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांनी साडे पाच लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा 407 मॉडेलचा टेम्पो क्र.एमएच 04 केएफ 0313 ओएलएक्सवर विक्रीसाठी काढला होता. दरम्यान 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मोबाईल 9004064736 क्रमांकावरून ओझा नामक व्यक्तीनं हजरत अली यांच्याशी संपर्क साधला होता. आम्हाला तुमचा टेम्पो आवडला असून खरेदी करायचा असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर भामटा ओझासह त्याचे तीन टेम्पो पाहण्यासाठी आले होते. हजरतअली यांच्या 'वसई जनता ट्रान्सपोर्ट सर्व्हिस' या गोदामातील गाळा क्र.7 मध्ये त्यांनी टोम्पोची पाहणी करत टेम्पोचे पैसे देतो, असं सांगून हजरत अली यांना शिल्पा चौकात नेलं.