महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात कमी पाणी पुरवठा होणाऱ्या ठिकाणी टँकरने नि:शुल्क पाणी

शहरात ज्या ठिकाणी कमी पाणी पुरवठा होत आहे किंवा पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. त्याठिकाणी महपालिकेच्यावतीने १५ जूनपर्यंत टँकरद्वारे नि:शुल्क पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

By

Published : May 14, 2019, 11:50 AM IST

ठाण्यात कमी पाणी पुरवठा होणाऱ्या ठिकाणी टँकरने नि:शुल्क पाणी

ठाणे- शहरात ज्या ठिकाणी कमी पाणी पुरवठा होत आहे किंवा पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. त्याठिकाणी महपालिकेच्यावतीने १५ जूनपर्यंत टँकरद्वारे नि:शुल्क पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच रमजान ईदच्या काळात मुंब्रा येथे टँकरने नि:शुल्क पाणी पुरवठा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.

ठाण्यात कमी पाणी पुरवठा होणाऱ्या ठिकाणी टँकरने नि:शुल्क पाणी

गेल्या काही दिवसांमध्ये पाणी पुरवठ्यांच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत आज याविषयी चर्चा केली. यावेळी ज्या ठिकाणी महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठा कमी आहे आथवा तो विस्कळीत झाला आहे आणि जे लोक नियमितपणे पाणी कर भरतात त्याठिकाणी १५ जूनपर्यंत महापालिकेच्यावतीने टँकरद्वारे नि:शुल्क पाणी पुरवठा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

शहरात ज्या ठिकाणी कमी पाणी पुरवठा होतो, अशा ठिकाणांची यादी पाणी पुरवठा विभागाने तयार करावी व त्यानुसार पाण्याचे टँकर पुरवावेत. यासाठी वेळ पडल्यास खासगी टँकर ताब्यात घेवून त्यांच्यामार्फतही पाणी पुरवठा करावा, असे जयस्वाल यांनी या बैठकीत स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी महापालिकेची वितरण व्यवस्था नाही, अशा ठिकाणी सिटेंक्स टाक्या बसवून त्यामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा. तसेच ज्या ठिकाणी छोटे टँकर जात असतील तेथे छोट्या टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, असे सांगितले.

दरम्यान, मुंब्रा येथे रमजान ईदच्या काळात शुक्रवारी होणाऱ्या शटडाऊनच्या काळात पहाटे ३ ते ६ या वेळेत टँकरने तसेच इतर दिवशी ज्या ठिकाणी कमी पाणी पुरवठा झाला असेल, त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, असे जयस्वाल यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details