महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' मुख्याध्यापकासाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा; पीडितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न

प्रमोद रामदेव नायक असे पोलीस कोठडीत असलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने ३० डिसेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, मुख्याध्यापक निर्दाष आहेत, असे त्या शाळेतील काही विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे.

By

Published : Dec 28, 2019, 11:23 PM IST

student-march-on-police-station-in-thane
पीडितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न

ठाणे - भिवंडी तालुक्यातील शेलार नदीनाका येथे एका शाळेतील मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली होती. मात्र, विद्यार्थी आणि पालकांनी मुख्याध्यापक निर्दाेष असल्याचे म्हणत पोलिसांनी त्यांना सोडावे, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा - अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत वर्गातच अश्लील चाळे; विकृत मुख्याध्यापकाला बेदम चोप

प्रमोद रामदेव नायक असे पोलीस कोठडीत असलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने ३० डिसेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, मुख्याध्यापक निर्दाेष आहेत, असे त्या शाळेतील काही विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. तेथे जाऊन मुख्याध्यापकाला सोडण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी ठाण्यात मुख्याध्यापकाच्या समर्थनात घोषणाबाजी केली. असे करून पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचे बोलले जात आहे.

या आंदोलनाची कल्पना पोलिसांना नव्हती. त्यामुळे प्रारंभी पोलीस बुचकळ्यात पडले. मात्र, पोलिसांनी विद्यार्थ्यांची समजूत काढली. आंदोलनामागे शाळा प्रशासनाचा हात असल्याचे खासगीत बोलले जात आहे. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राम भालसिंग यांनी या प्रकरणात निष्पाप विद्यार्थ्यांना यात ओढण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले. तसेच ही कायदेशीर व न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणी फूस लावून पोलीस ठाण्यात आणून घोषणाबाजी करण्यास लावले असेल, तर त्याचा तपास करून दोषींच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details