ठाणे - केंद्र सरकारने लागू नव्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नाव न घेता राजू शेट्टींवर जोरदार टीका केली. काही लोक आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस आणि गोड चहा घेतात, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले.
सद्याचे सरकार कुचकामी -
लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करतो, असे खोट बोलून फक्त आमदारी मिळावी, यासाठीचे प्रयत्न शेतकऱ्यांना दिसून येत आहे. एकबाजूला सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि दुसऱ्या बाजूला कारखाना मालकांच्या मांडीला मांडी लावून बसायचे, हे उद्योग बंद करा, असा टोलाही त्यांनी राजू शेट्टी यांना लगावला. तसेच आमच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला, त्याचे प्रश्न सोडवले. तसेच अनेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचे केले. परंतु सद्याचे सरकार कुचकामी असून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाहीत. तसेच त्यांना शेतकऱ्याचे काही घेणे देणे नसून फक्त स्वार्थ साधायचा, अशी टीका खोत यांनी यावेळी केली.
काहींनी शेतकऱ्यांचा डोक्यात भ्रम निर्माण केला -