ठाणे -देशात वर्षानुवर्षे माथी भडकविण्याची कामे चालू आहेत. भारतातील मुस्लीम बांधवांना नागरिकत्व कायद्याबाबत कोणतीही अडचण नसल्याचे मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे त्यांना पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा -नागरिकत्व कायद्याविरोधात ठाणेकरांचा एल्गार, युवकांचा लक्षणीय सहभाग
नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत संमत झाल्यावर या कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. परंतू या कायद्याला मुस्लीम बांधवांचा विरोध नसल्याचे पोंक्षे यांनी म्हटले आहे. पोंक्षे म्हणाले, की केवळ विरोधाला विरोध न करता हे कायदा समजून घेतला पाहिजे. त्यामुळे या कायद्याबाबत गैरसमज पसरवू नये. आधीच देशाची सोकसंख्या १३६ कोटींवर गेली आहे. एवढ्या लोकसंख्येला अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यांना तो कसा पुरवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही लोकसंख्या १०० कोटींच्या आत आणली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.