ठाणे - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. दिवसागणिक कोरोनाचे नव्याने रुग्ण समोर येत आहेत. त्यातच काही रुग्णांचा मृत्यू देखील होत आहे. भिवंडीतील कामतघर परिसरातील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. रुग्णालयाने मृतदेह प्लास्टिकमध्ये बंद करुन दिला. मात्र, मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी मृतदेह प्लास्टिकच्या बाहेर काढून ठेवला आणि त्याला अलिंगन देऊन दु:ख व्यक्त केल्याचा प्रकार घडला आहे.
धक्कादायक..! नातेवाईकांचे कोरोनाबाधित मृतदेहाला अलिंगन.. ४५ जण क्वारंटाइन
ठाण्याच्या भिवंडीतील कामघर परिसरातील एका कोरोनाग्रस्त व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयाने मृतदेह संबंधित कुटुंबाच्या स्वाधीन करताना प्लास्टिकमध्ये बंद करून दिला. मात्र, त्याच्या नातेवाइकांनी मृतदेह घरी आणल्यानंतर तो प्लास्टिमधून बाहेर काढून ठेवाला.
ठाण्याच्या भिवंडीतील कामघर परिसरातील एका कोरोनाग्रस्त व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयाने मृतदेह संबंधित कुटुंबाच्या स्वाधीन करताना प्लास्टिकमध्ये बंद करून दिला. मात्र, मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी मृतदेह घरी आणल्यानंतर तो प्लास्टिमधून बाहेर काढून ठेवाला. शिवाय मृतदेहाला अलिंगन देऊन दु:ख व्यक्त केले. तसेच ५० ते ६० जणांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबतची माहिती परिसरातील माजी नगरसेवक कमलाकर पाटील यांना मिळताच त्यांनी पालिका आयुक्तांना या घडलेल्या प्रकराची माहिती दिली. आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांना तत्काळ सूचना देऊन पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाच्या संपर्कात आलेल्या ४५ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मात्र, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर हा संपूर्ण परिसर सील करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांनी दिली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच उल्हानसागर शहरात देखील असाच धक्कादायक प्रकार दोनदा समोर आला असून याप्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केला आहे. दरम्यान, अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांचा शोध घेऊन त्यांनाही क्वारंटाइन सेंटरमध्ये हलवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.