महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#covid19: भिवंडीतील 'रेड लाईट एरिया' रविवारपर्यंत बंद...

भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथील रेड लाईट परिसरातील 300 पेक्षा अधिक महिलांनी त्यांचा व्यवसाय बंद केला आहे. या महिलांच्या मुलांसाठी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून बाल संगोपन केंद्र चालविणाऱ्या डॉ. स्वाती खान यांनी या महिलांची सभा घेऊन हा निर्णय घेतला.

red-light-area-closed-till-sunday-in-bhiwandi
भिवंडीतील 'रेड लाईट एरिया' रविवारपर्यंत बंद...

By

Published : Mar 20, 2020, 7:26 PM IST

ठाणे- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना, राज्यात सर्वत्र खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणचे दुकाने, मॉल, कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यालाच अनुसरुन भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथील वेश्या व्यवसाय (रेड लाईट एरिया) रविवारपर्यंत बंद केला आहे.

हेही वाचा-COVID-19 LIVE : देशात २२३ रुग्ण, तर राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५२..

संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसने हादरले असताना, राज्यात त्याचा विळखा वाढत आहे. त्यामुळे शासनाकडून युद्ध पातळीवर या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथील रेड लाईट परिसरातील 300 पेक्षा अधिक महिलांनी त्यांचा व्यवसाय बंद केला आहे. या महिलांच्या मुलांसाठी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून बाल संगोपन केंद्र चालविणाऱ्या डॉ. स्वाती खान यांनी या महिलांची सभा घेऊन हा निर्णय घेतला.


तीन दिवस आमचा व्यवसाय बंद ठेवून बाहेरील व्यक्तीस या परिसरात येऊ देणार नसल्याची माहिती येथील वारांगना महिलेने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details