ठाणे- शहरासह जिल्ह्यात शनिवारी 250 मिलीमीटर पाऊस झाला. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही ठाण्यात जोरदार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे तर रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक सखोल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे. या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा प्रभावित झाली असून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत.
ठाण्यात मुसळधार ! रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचे हाल
शनिवारी 250 मिलीमीटर पाऊस झाला आहे. मात्र, आजही ठाण्यात जोरदार पाऊस पडत आहे. आजही ठाण्यात जोरदार पाऊस पडत आहे.
सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसाने आजही हजेरी लावली आहे. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरण झाले असून वाहने देखील धिम्यागतीने धावत आहेत. तर ठाण्याच्या वंदना बस स्टॉप वर आणि काही सखोल भागात पाणी साचले चित्र दिसून येत आहे. गेल्या तासाभरात 26 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण दिवसभरात अडीचशे मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे. सकाळपासूनच पडणाऱ्या पावसाने ठाणेकरांचे जनजीवन विस्कळीत झालेला आहे. तसेच मध्य रेल्वे सेवादेखील विस्कळीत झालेली आहे. ठाणे ते सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या बंद झाले आहेत.पावसाचा जोर कायम राहिला तर नक्कीच अनेक सखोल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे.