महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंब्रा कौसामधील खासगी रुग्णालय सील; कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

सील करण्यात आलेले खाजगी हॉस्पिटल मुंब्र्यात सर्वात मोठे आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे आहे. हे आता सील करण्यात आल्यामुळे इथल्या जनतेची मोठी गैरसोय होणार आहे.

मुंब्रा कौसामधील खासगी रुग्णालय सील; कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
मुंब्रा कौसामधील खासगी रुग्णालय सील; कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

By

Published : Apr 8, 2020, 7:46 PM IST

ठाणे - मुंब्य्रात मंगळवारी रात्री उशिरा सापडलेला रुग्ण हा मुंब्र्यातील एका मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये कामाला असल्याचे उघड झाल्यानंतर आता हे हॉस्पिटलच ठाणे महापालिकेने सील केले आहे. या हॉस्पिटलच्या स्टाफमधील ६ जणांना भाईंदर पाडा येथील विलगीकरणात हलवण्यात आले असून त्यांच्या रक्ताचे नमुनेदेखील घेण्यात आले आहे. सील करण्यात आलेले हे खाजगी हॉस्पिटल मुंब्र्यात सर्वात मोठे आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त असल्याने आता हे हॉस्पिटल सील करण्यात आले असल्याने मुंब्र्यातील मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे.

कळवा आणि मुंब्र्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून याचा फटका आता खासगी हॉस्पिटललादेखील बसत असल्याने आरोग्य यंत्रणेवरदेखील याचा परिणाम होऊ लागला आहे. मंगळवारी मुंब्य्रातील अमृत नगर भागात आधीच्या रुग्णाच्या संपर्कातील आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. तर सायंकाळर्पयत त्यामध्ये आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. हा रुग्ण येथीलच एका खासगी रुग्णालयात कामाला होता. त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून पालिकेने आता या रुग्णालयातील सहा जणांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या इतरांचा शोध आता सुरू झाला आहे. तसेच शहराच्या इतर भागात खबरदारीचे उपायही केले जात होते.

आता शहरातील रुग्णांची संख्या 25 झाली असून दिवसभरात नवा रुग्ण आढळला नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. जे हॉस्पिटल सील केले आहे ते मुंब्र्यातील सर्वात मोठे हॉस्पिटल असून यामध्ये २०० ते २५० स्टाफ असून बाहेरून यामध्ये बाहेरून येणाऱ्या डॉक्टरांची आणि नर्सची संख्या जास्त आहे. मात्र, लॉकडाऊननंतर हॉस्पिटलमधील बहुतांश डॉक्टर आणि नर्स सुट्टीवर असल्याचे हॉस्पिटल व्यवस्थापनाने सांगितले आहे. महापालिकेने नोटीस दिल्यानंतर हॉस्पिटल सील करण्यात आले असल्याचे व्यवस्थापनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details