ठाणे- गणेश विसर्जन सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. गणरायाचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विसर्जन घाट, कृत्रिम घाटांची निर्मिती केली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. सोबत सीसीटीव्हीची करडी नजर विसर्जन घाटावर राहणार आहे.
हेही वाचा - ठाण्यातील महापौर, आयुक्त वादात उद्धव ठाकरे यांची मध्यस्ती
गणेश विसर्जनासाठी साडेतीन हजार पोलीस बंदोबस्तासाठी असणार आहेत. एसआरपीएफ आणि वाहतूक विभागाकडून कडून देखील चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विसर्जन घाटाच्या मार्गावर अवजड वाहने येण्यास बंदी केली आहे. त्यामुळे त्या वाहनांना इतरत्र वळवण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विसर्जन घाटावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येणार आहे.