महाराष्ट्र

maharashtra

अश्‍लील हावभाव करत बारबालांचे नृत्य, अंगावर नोटांचा पाऊस अन्‌...

कल्याण रेल्वे स्थानकासमोर नीलम लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार आहे. या बारमधील 5 नर्तिकांसह वेटर व चालक आणि ग्राहक अशा 11 जणांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

By

Published : Feb 1, 2020, 10:36 AM IST

Published : Feb 1, 2020, 10:36 AM IST

Updated : Feb 1, 2020, 3:40 PM IST

Thane
ठाणे

ठाणे- 'मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा...' या मराठी गाण्यावर अश्लील व बिभत्स नृत्य करणाऱ्या बारबालांना आणि ग्राहकांना बारचालकासह पोलिसांनी ताब्यात घेतले. नीलम लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारमध्ये महात्मा फुले पोलीस पथकाने छापा टाकत ही कारवाई केली. यामध्ये 5 नर्तिकांसह 3 वेटर व बारचालक आणि 2 ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले.

याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी 5 नर्तिकांसह वेटर व चालक आणि ग्राहक अशा 11 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. रॉनी अँथनी (53) असे ऑर्केस्ट्रा बार चालकाचे नाव आहे. तर कृष्णाकुमार रजक (24), राजू गुप्ता (25 ) राजेश पटेल (30) असे चालकासह ताब्यात घेतलेल्या वेटरची नावे आहेत. तर सुरेंद्र प्रधान (30) गजेंद्र कोष्टी (37) असे कारवाई दरम्यान ताब्यात घेतलेल्या ग्राहकांची नावे आहेत.

हेही वाचा - मनसेच्या आंदोलनात अनेकांनी सहभागी व्हावे - सरदेसाई

कल्याण रेल्वे स्थानकासमोरच नीलम लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार आहे. या बारमधील नर्तिका अंगावर तोकडे कपडे परिधान करत अश्लील हावभाव करून मद्यपी ग्राहकांना इशारे करत असल्याचे आढळून आले. या बारबाला गाण्यांवर अश्लील नृत्य करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून मध्यरात्री सव्वाएक वाजण्याच्या सुमारास पोलीस पथकाने नीलम ऑर्केस्ट्रा बारवर अचानक छापा टाकला.

बारबालांच्या अंगावर नोटांचा पाऊस -

पोलिसांनी छापा टाकला त्या वेळी, बारमध्ये तोकडे कपडे परिधान केलेल्या 4 नर्तिका गाण्यावर अश्लील नृत्य व हावभाव करत ग्राहकांना इशारे करत असल्याचे निदर्शनास आले. मद्यप्राशन केलेले ग्राहकही या नर्तिकांसोबत अश्लील हावभाव करत पैसे उधळत असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी पोलीस नाईक जितेंद्र चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नीलम ऑर्केस्ट्रा बारचा चालक, वेटर, तसेच ग्राहक आणि 5 नर्तिका महिला अशा 11 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास ढोले करत आहेत.

हेही वाचा -ठाण्यातील पदपथे नागरिसांसाठी मोकळे करावेत - महापौर म्हस्के

Last Updated : Feb 1, 2020, 3:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details