ठाणे - ऑर्केस्ट्राच्या नावाने अश्लील नृत्यू सुरू असलेल्या लेडीज बारवर कोळसेवाडी पोलिसांच्या पथकाने बुधवारी रात्रीच्या छापा टाकला. या 'कशिश बार'मध्ये ३५ बारबाला अश्लिल नृत्य करत होत्या. पोलिसांनी या बारबालांना ताब्यात घेतले आहे. बारमध्ये अय्याशी करणाऱ्या ग्राहकांसह बारच्या कर्मचाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
'कशिश बार'मध्ये पोलिसांचा छापा अचानक मारला छापा -
कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहुराजे साळवे, डीबी पथकाचे पोलीस निरीक्षक भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कल्याण पूर्वेतील नांदिवली गावाच्या हद्दीत असलेल्या 'कशिश बार'मध्ये अचानक छापेमारी केली. त्यावेळी एका हिंदी गाण्यावर तोकडे कपडे घालून अश्लील हावभाव करत बारबालांचा ग्राहकांसमोर नाच सुरू होता. या छापेमारीत पोलिसांनी ३५ बालबालांसह इतरांना ताब्यात घेतले.
परवानगीपेक्षा जास्त बारबालांची उपस्थिती -
ऑर्केस्ट्रा बारमध्ये केवळ ४ गायिकांना ठेवण्याची परवानगी आहे. असे असतानाही या बारमध्ये ३५ बारबाला एकाचवेळी उपस्थित होत्या. शिवाय बारबाला तोकडे कपडे घालून अश्लिल नृत्य करत होत्या. बारचा चालक-मालक, कर्मचारी व ग्राहकांविरोधात बारबालांना अश्लिल नृत्यू करण्यास संगनमताने प्रोत्साहित केल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण- डोंबिवली शहरातील ऑर्केस्ट्रा बारमध्ये सर्रास बारबालांना नाचवले जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.