महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात पक्षांना उन्हापासून वाचविण्याचा प्रयत्न; राबविण्यात आला 'दाणा-पाणी' उपक्रम

ठाण्यातील ब्रम्हांड परिसरात पक्षांना वाचविण्यासाठी 'दाणा-पाणी' हा उपक्रम राबविण्यात आला. ठाण्यातील ब्रम्हांड येथे पक्षी व प्राण्यांसाठी दाना व पाणी ठेवले आहे.

पक्षांना उन्हापासून वाचवण्याचा प्रयत्न

By

Published : May 6, 2019, 10:00 PM IST

ठाणे- रखरखत्या उन्हात कधी बाहेर पडल्यावर अचानक तहान लागली की कुणाचाही जीव कासावीस होतो. अशा वेळी कुठे पाणी मिळाले की शांत झाल्याचा अनुभव येतो. प्राणी व पक्ष्यांचीही हीच अवस्था असते. सूर्य डोक्यावर आग ओकत असताना पक्षी व प्राण्यांना अन्न-पाण्यासाठी फिरावे लागते. पक्ष्यांचा हा संघर्ष कमी करण्यासाठी ठाण्यात 'दाणा-पाणी' हा विशेष उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

पक्षांना उन्हापासून वाचविण्याच्या प्रयत्नांची माहिती देताना नानजी ठक्कर

प्राण्यांचा हा संघर्षं कमी करण्यासाठी ठाण्यातील करीना दयालानी व नानजी ठक्कर व तसेच त्यांच्या बरोबर असलेले सहकारी पुढे सरसावले आहेत. त्यांनी ठाण्यातील ब्रम्हांड येथे पक्षी व प्राण्यांसाठी दाना व पाणी ठेवले आहे. ठाण्यातील ठिकठिकाणी असा उपक्रम राबविण्यात आला आहे. हा उपक्रम राबविणाऱ्या समाजसेवकांनी ऍनिमल हॉस्पीटल आणि इमरजेंसी सेंटरला भेट दिली. तेथील पक्षी व प्राण्याची पाहणी केली. हॉस्पीटलच्या डॉक्टर आणि अधिकाऱ्यांशीही बातचीत केली.

ABOUT THE AUTHOR

...view details