महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबईत सेंट जोफेस हायस्कूलसमोर संतप्त पालकांचे शुल्कवाढी विरोधात आंदोलन

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. सध्या ऑनलाइन पद्धतीने मुलांना शिकवले जात आहे. परिणामी शाळांनी त्यांचे अतिरिक्त शुल्क वगळून पालकांकडे नियमित शुल्क मागणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शाळा असे न करता सर्वच शुल्कासाठी पालकांकडे तगादा लावत आहेत.

By

Published : Oct 26, 2020, 7:57 PM IST

St. Joseph's High School
सेंट जोफेस हायस्कूल

नवी मुंबई -कळंबोलीतील सेंट जोफेस हायस्कूल प्रशासन नेहमीच वादाच्या भवऱ्यात अडकलेले असते. आता शाळेच्या फी वाढीचा मुद्दा गाजत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेने फी वाढ केल्यामुळे पालक आक्रमक झाले असून, त्यांनी शाळेसमोर आज निदर्शने केली आहेत. मुख्याध्यापिकांना निवेदन देत अतिरिक्त शुक्ल न घेण्याची मागणी केली पालकांनी केली आहे.

शाळा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करताना पालक

पालक आर्थिक संकटात -

कोरोनाच्या संकटामुळे अनेक पालकांच्या उद्योग-धंदे, व्यवसाय व नोकरीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकजण आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्याही शैक्षणिक संस्थांनी फी वाढ करू नये, असा आदेश शासनाने दिला आहे. पालकांना शक्य होईल त्या प्रमाणे टप्प्या-टप्प्यांत फी भरण्याची मुभाही पालकांना देण्यात आली आहे. असे असतानाही सेंट जोसेफ शाळा पालकांकडून अतिरिक्त शुल्क वसूल करत आहे.

अतिरिक्त शुल्क न आकारण्याची मागणी -

कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून शाळा बंद आहेत. दोन महिने शाळा झाली नाही. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे शाळांकडून वार्षिक शुल्क आकारताना प्रत्येकवेळी लावण्यात येणारे अतिरिक्त शुल्क लावू नये, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. सेंट जोफेस हायस्कूलकडून पालकांना शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी वारंवार सक्ती केली जात आहे. शाळा बंद असूनही जेवणाचे पैसे, प्रवासी बसचे पैसे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे पैसे, संगीत आणि नृत्य वर्गाचे पैसे असे अतिरिक्त शुल्क शाळा आकारत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला.

याबाबत शाळेला आणि शिक्षण विभागाला पत्रव्यवहार करूनही कुठलाच दिलासा मिळाला नाही. इतकेच नाही तर शैक्षणिक शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या मुख्य इमारतीसमोर आंदोलन केले. यावेळी शाळा प्रशासनाने प्रसिद्धी माध्यमांना सामोरे जाण्यास नकार दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details