महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याणात मुख्यमंत्र्यांच्या सभेत रिकाम्या खुर्च्या, भाजपच्या गोटात खळबळ

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील फडके मैदानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजयी संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहतच कार्यकत्यांनी सभेतून काढता पाय घेतला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेत रिकाम्या खुर्च्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

कल्याणात मुख्यमंत्र्यांच्या सभेत रिकाम्या खुर्च्या

By

Published : Apr 22, 2019, 11:23 PM IST

ठाणे- भिवंडी लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी मुख्यमंत्री कल्याणात आले होते. यावेळी मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहतच कार्यकत्यांनी सभेतून काढता पाय घेतला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेत रिकाम्या खुर्च्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

कल्याणात मुख्यमंत्र्यांच्या सभेत रिकाम्या खुर्च्या

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील फडके मैदानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजयी संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सभेच्या ठिकाणी मंडप नसल्याने उघड्यावर गालीचा टाकून त्यावर सभेसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली.

या सभेची वेळ ४ वाजता होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २ तास उशिरा आले. या सभेसाठी भिवंडी ग्रामीण आणि गाव पाड्यातून आलेल्या श्रमजीवी संघटनेचे आदिवासी महिला, पुरुष कार्यकत्यांना ३ वाजल्यापासूनच सभेच्या ठिकाणी वाहनांनी आणण्यात आले. त्यामुळे आदीच कडकत्या उन्हाचा चटका सहन करत हे आदिवासी खुर्च्यांवर बसले होते. त्यानंतर युतीच्या नेत्यांची भाषणे तासभर रंगली होती. याच भाषणाला युतीच्या कार्यकत्यांना कंटाळा आला.

सभा २ तास उशिरा सुरु झाल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण सुरु होण्याअगोदरच अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या झाल्या. तर मुख्यमंत्री यांचे भाषण ८ वाजता झाले. आदीच उशीर झाल्याने मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहतच कार्यकत्यांनी सभेतून काढता पाय घेतला. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details