नवी मुंबई - देशातील विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन हाय प्रोफाइल सूट बुक करून त्याठिकाणी वास्तव्या दरम्यान उच्चप्रतीचे मद्य व सिगारेटची मागणी करून तेथून पसार होणाऱ्या भामट्याला वाशी पोलिसांनी केली आहे. या भामट्याने देशातील काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या तब्बल १८७ हॉटेल व्यवस्थापनाची फसवणूक केली आहे. व्हीनसेंट जॉन (65 वय) असे त्या भामट्याचे नाव आहे.
स्वतःच्या मौज मजेसाठी विविध पंचतारांकित हॉटेल व्यवस्थापनाची फसवणूक करणाऱ्या व्हीनसेंट जॉनला अटक करण्यास वाशी पोलिसांना यश आले आहे. अस्सलखित इंग्रजी भाषेचा वापर करून आपण उद्योगपती असल्याचे भासवत हॉटेल मधील हाय प्रोफाइल सूट बुक करून त्याठिकाणी वास्तव्य करायचा. या दरम्यान महागडी दारू आणि सिगरेटची मागणी करून हा ठग ती दारू, सिगरेट व हॉटेल मधील इतर वस्तू घेऊन फरार होत होता.
मौज मजेसाठी १८७ पंचतारांकित हॉटेलमध्ये फसवणूक; महागड्या दारूसह पसार होणाऱ्या भामट्यास अटक
देशातील विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून तेथील महागडी दारू सिगारेट घेऊन फरार होणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे.
वाशी येथील तुंगा हॉटेल मध्ये देखील या ठगाने असेच कृत्य करत हॉटेल व्यवस्थापनाची फसवणूक केली होती. त्यानंतर तक्रार दाखल होताच वाशी पोलिसांनी मोठ्या शिताफीने या आरोपी भामट्याचा शोध घेत त्याला अटक केली आहे. चौकशी दरम्यान आरोपीने आतापर्यंत 187 पंचतारांकित हॉटेल व्यवस्थापनाची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.
31 डिसेंबर पर्यंत 200 हॉटेल्सची फसवणूक करण्याचा मानस -
31 डिसेंबर पर्यंत 200 हॉटेल्सची फसवणूक करण्याचा मानस असल्याचा धक्कादायक खुलासाही आरोपीने केला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने असल्या फसव्या ग्राहकांपासून सावध राहण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.