महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली-कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना मनसेचा हात, मदत घेऊन कार्यकर्ते रवाना

पूरग्रस्तांना ठाण्यातून चार ते पाच ट्रक भरून जीवनाश्यक वस्तू आणि औषधी ठाणे मनसेने पाठवले आहे. मनसे ने ठाणेकरांना मदतीसाठी आव्हान केले. त्या आव्हानांला ठाणेकरांनी भरघोस प्रतिसाद देत स्वतःहून मदत केली.

सांगली-कोल्हापूरमधील पूरग्रस्ताना मनसेचा हात, मदत घेऊन कार्यकर्ते रवाना

By

Published : Aug 11, 2019, 9:05 AM IST

ठाणे - महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगली भागात अक्षरश: दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. पूरामुळे सांगली आणि कोल्हापुरातील सर्वांचीच घरे-दारे गेली आहेत. अशा परिस्थितीत मनसेने कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

सांगली-कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना मनसेचा हात, मदत घेऊन कार्यकर्ते रवाना

पूरग्रस्तांना ठाण्यातून चार ते पाच ट्रक भरून जीवनाश्यक वस्तू आणि औषधी ठाणे मनसेने पाठवले आहे. मनसे ने ठाणेकरांना मदतीसाठी आव्हान केले. त्या आव्हानांला ठाणेकरांनी भरघोस प्रतिसाद देत स्वतःहून मदत केली. ठाणे मनसेचे पन्नास कार्यकर्ते शनिवारी रात्री ८ वाजता हे सर्व साहित्य घेऊन गेले. यात अन्नधान्य, पाणी, ब्लँकेट, कपडे, साड्या आणि औषधी आहे.

महत्वाचे म्हणजे या सामानांवर इतर पक्षांप्रमाणे दिलेल्या वस्तूंवर कोणत्याही प्रकारचे स्टिकर नाही. कारण आम्ही खऱ्या अर्थाने मदतीसाठी जात आहोत. इतरांप्रमाणे देखाव्यासाठी नाही असं वक्तव्य ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details