ठाणे- कल्याण ते कसारा दरम्यान बल्यानी गावानजीक मंगला एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये दुपारी अडीचच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेसेवा तब्बल 1 तास विस्कळीत झाली होती. यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मात्र बिघाड दुरुस्त करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
मंगला एक्सप्रेस एक तासानंतर दुरुस्त; इंजिनमध्ये झाला होता बिघाड
कल्याण ते कसारा दरम्यान बल्यानी गावानजीक मंगला एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये दुपारी अडीचच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेसेवा वाहतूक 1 तासापासून विस्कळीत झाली होती. यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मात्र बिघाड दुरुस्त करुन वाहतुक सुरळीत करण्यात आली.
मंगला एक्स्प्रेस एक तासानंतर दुरुस्त
टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या कल्याण दिशेने जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसच्या इंजिनामध्ये अचानक बिघाड झाला होता. त्यामुळे येथील वाहतूक रोखण्यात आली होती. ही एक्सप्रेस खडवलीहून अतिरिक्त इंजिन रवाना करण्यात आले. त्यानंतर तासाभरात इंजिन दुरुस्ती करण्यात आली आणि या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे. मात्र, यामुळे कल्याणहुन कसाराच्या दिशेने जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत.