ठाणे -संपूर्ण जगासह देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यामुळे पाच महिन्यांपासून नाभिक व्यावसायिकांना केश कर्तनालयाची दुकानेदेखील बंद ठेवणे भाग पडले. या काळात कुटुंबाचे पालन पोषण करण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने कौटुंबिक विवंचनेतून राज्यात १६ नाभिक व्यावसायिकांनी आत्महत्या केली. कोणी विषारी औषध घेऊन तर काहींनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
या आत्महत्यांमध्ये नवनाथ साळुंखे (वय ३५, रा. इरळी,ता.कवठेमहाकाळ, जि. सांगली), दीपक तुळशीराम महोकार (वय ४३ रा. शनवारा ता. आकोट जि. अकोला), स्वप्निल चौधरी (वय ३० रा.दुर्गापूर जि. चंद्रपूर) रामदास कडूकर (वय ५८ ता. मोरगाव जि. यवतमाळ), शांताराम श्रावण शिरसाठ (वय ४२ रा. शिरपूर जि. धुळे), अशोक बानक (वय ३५ रा. डबकी, ता.देवरी, जि. गोंदिया), सतिश मनोहर धानोरकर (वय ३५ रा. तिवसा जि. अमरावती), रामराव चांदूरकर (वय ५५ रा. खानापूर ता.मोर्शी जि.अमरावती), दिलीप बाबुराव कापसे (वय ५१ रा. यादवनगर ता. पाचपावली जि. नागपूर), बबन सूर्यवंशी (वय ४५ रा. निमगाव ता.अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया), केशव वसंता वाटकर (रा. दारोडा ता. हिंगणघाट जि. वर्धा), खंडू बाबूराव पंडीत (रा. हिवरा ता. बूम जि. अहमदनगर), शैलेश यशवंतराव लक्षने (वय ४० रा. बैलतरोडी (पिवळी),जि. नागपूर), मनोहर नास्नूरकर (वय ५१ रा. पार्वतीनगर, नागपूर, जि. नागपूर), चंद्रकांत कोंडीराम दळवी (रा. इस्थळ ता.केज जि.बीड), मयूर नरेश जाधव रा.कांबे ता. भिवंडी जि.ठाणे) आदींचा समावेश आहे.