महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबईत संचारबंदी तोडणाऱ्यांना पोलिसांचा दणका, तब्बल दोनशे दुचाकी जप्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अशात कामाशिवाय रस्त्यांवर फिरणाऱ्या लोकांना कामोठे पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. कामोठे पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल दीडशे ते दोनशे दुचाकी जप्त केल्या आहेत.

By

Published : Apr 2, 2020, 10:04 AM IST

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अशात कामाशिवाय रस्त्यांवर फिरणाऱ्या लोकांना कामोठे पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. कामोठे पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल दीडशे ते दोनशे दुचाकी जप्त केल्या आहेत.

देशात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश काही ठिकाणी पायदळी तुडविले जात आहेत. अशाच महाभागांना कामोठे पोलिसांनी कायद्याचा दणका दिला आहे. या कारवाईमुळे दुचाकीवरून फिरणाऱ्यांच्या मनात चांगलीच दहशत बसली आहे.

संचारबंदीचा नियम तोडणाऱ्यांवर कारवाई

यापूर्वीही कामोठ्यात नाकाबंदी करण्याची विनंती पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येत होती. मात्र, त्याला न जुमानता लोक रस्त्यावर आणि नाक्यावर फिरत होते. त्यामुळे, अखेर आज कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details