ठाणे :तांत्रिक कारणांमुळे क्रेडिट कार्ड लॉग-इन करु शकत नाही, अशी बतावणी करुन ठाण्यातील एका महिलेला तब्बल 54 हजार रुपयांचा गंडा ( Thane Woman Cyber Fraud ) घातला आहे. याप्रकरणी झारखंड मधील चोरट्यांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केली ( Police Arrested Criminal In Jharkhand ) आहे.
झारखंडमधील जामताडा जिल्हा सायबर ( Jharkhand Jamtara Cyber Crime ) क्राईम संबंधित गुन्ह्यासाठी देशभरात कुप्रसिद्ध आहे. त्यांच्या कृष्णाकृत्यांवर जामताडा चित्रपटही येऊन गेला आहे. खोट्या सिमकार्डच्या माध्यमातून ग्राहकांना फोन करुन त्यांच्या खात्यातील रक्कम या भामट्यांकडून काढली जाते. आतापर्यंत अनेकांना त्यांनी आपले शिकार बनवले आहे. ठाण्यातील एका महिलेला देखील क्रेडिट कार्ड अकाउंट लॉगइन होत नसून ते करण्यासाठी अनेक अॅप्स डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड अकाउंट मधून तब्बल 54 हजारांची रोकड आपल्या बँक खात्यात वळती करून घेतली.