महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Consumer Forum Order: विमा कंपनीला ग्राहक मंचाचा दणका; कोविड रुग्णाला ३ लाख ४३ हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश

२०२० साली कोविड रुग्णाला ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णाकडे विमा कंपन्यांचा हेल्थ इन्शुरन्स विमा असून त्याला रुग्णालयातील बिलाची रक्कम मिळाली नव्हती. त्यामुळे ग्राहक न्यायालयात त्या व्यक्तीने धाव घेतली. याप्रकरणी वेळोवेळी सुनावणी होऊन विमा कंपनीसह 'थर्ड पार्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेटर'ला ठाणे जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाने ३ लाख ४३ हजार रुपये नुकसान भरपाईचा आदेश देत, विमा कंपनीला दणका देणारा निकाल दिला आहे.

By

Published : May 16, 2023, 8:47 PM IST

Consumer Forum Order
ग्राहक मंचाचा दणका

ठाणे: कल्याणच्या सुफाला सोसायटीत राहणारे जयेश द्वारकादास राजा यांनाही कोविड आजाराची लागण झाल्याने त्यांच्यावर कल्याण पश्चिम भागातील रिद्दी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या उपचाराचे एकूण बिल ४ लाख ४७ हजार ७७१ रुपये झाले होते. त्यानंतर विमा कंपनीने त्यांना केवळ १ लाख ३४ हजार रुपये मंजूर केले होते. त्यावर राजा यांनी आक्षेप घेत ठाणे जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाकडे विमा कंपनी विरोधात दावा दाखल केला. या दाव्यावर ६ एप्रिल २०२२ रोजी अंतिम सुनावणी झाली.


विमा कंपनी याबाबत अपयशी:या दरम्यान राजा यांनी रुग्णालयाच्या ३ लाख १३ लाख ७७१ दाव्याची शिल्लक रक्कम आणि त्याच्या मानसिक छळाची आणि खटल्याच्या खर्चाची नुकसान भरपाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी ग्राहक मंचाकडे केली. विशेष म्हणजे, राजा यांची फेब्रुवारी २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीसाठी 'मेडिक्लेम विमा पॉलिसी' मिळवली होती. त्यांच्या विम्याची रक्कम ५ लाख २५ हजार रुपये असल्याचे पुरावे त्यांनी ग्राहक न्यायालयात दिले. त्यानंतर ग्राहक मंचाकडून विमा कंपनीला नोटीस बजावण्यात आली. तरी देखील दाव्याच्या रकमेसाठी केवळ १ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम का मंजूर करण्यात आली? हे सिद्ध करण्यात विमा कंपनी अपयशी ठरली.


ग्राहक मंचाचा निर्णय:वास्तविक पॉलिसीची विमा रक्कम ५ लाख २५ हजार रुपये असल्याने, तक्रारदार राजा यांना एकूण दाव्याची रक्कम मिळण्याचा अधिकार होता. शिवाय तक्रारदाराने असेही सादर केले आहे की, पॉलिसीसह त्याला कोणत्याही अटी आणि शर्ती प्रदान केल्या नाहीत, असे त्यात म्हटले आहे. त्यामुळे, ग्राहक मंचाने दोन्ही विमा कंपनींना ३ लाख १३ हजार ७७१ रुपये शिल्लक दाव्याची रक्कम तसेच वार्षिक १० टक्के व्याजासह रक्कम वसूल होईपर्यंत देण्याचे निर्देश दिले. तसेच विमा कंपन्यांनी तक्रारदार राजा यांना मानसिक त्रास व छळासाठी २० हजार आणि कार्यवाहीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई देण्याचे निर्देश ठाणे जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी आणि सदस्य पूनम व्ही महर्षी यांनी दिले आहे.

हेही वाचा:

  1. Vande Bharat Express : गोव्याला जाणाऱ्यासाठी आनंदाची बातमी; लवकरच धावणार मुंबई-गोवा मार्गावर 'वंदे भारत एक्स्प्रेस'
  2. Rupali Chakankar Demand: हरवलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी 'महा महिला आयोगा'ची समिती स्थापन करण्याची मागणी
  3. Jowari Bajri On Ration Card : आता ज्वारी, बाजरी मिळणार शिधापत्रिकेवर

ABOUT THE AUTHOR

...view details