ठाणे -एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांसाठी रेमडेसिवीरचा लसींचा साठा खाजगी रुग्णालयात मिळणे कठीण झाले आहे. त्यातच दुसरीकडे रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या दोन जणांना ठाणे खंडणी पथकाने रेमडेसिवीरचा विकताना तीन हात नाका येथून अटक केली आहे. ठाणे खंडणी पथकाने अटक केलेल्या दोघांकडून 21 रेमडेसिवीरचा हस्तगत केले आहेत. हे दोघे आरोपी 5 ते 10 हजार रुपयांमध्ये रेमडेसिवीरचा विकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाण्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक
दुसरीकडे रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या दोन जणांना ठाणे खंडणी पथकाने रेमडेसिवीरचा विकताना तीन हात नाका येथून अटक केली आहे. ठाणे खंडणी पथकाने अटक केलेल्या दोघांकडून 21 रेमडेसिवीर हस्तगत केले आहेत.
अटक केलेल्यांपैकी एक जण खाजगी नर्सिंग होम मध्ये कामाला आहे. तर दुसरा सामान्य नागरिक आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या मध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता ठाणे खंडणी विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी वर्तवली आहे.
रेमडेसिवीरची कमतरता ...
ठाण्यात मागील काही दिवसांपासून रेमडेसिवीरची मोठी कमतरता भासत आहे. रुग्णांच्या नातेवईकांची धावपळ रेमडेसिवीरची मिळवण्यासाठी सुरु आहे. मात्र, तरीही अशा प्रकारे काही लोक पैसे कमवण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई झाली, तरच हे प्रकार टाळता येऊ शकतात.