ठाणे- आज सकाळपासूनच पावसाने ठाणे आणि परिसरात जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे मासुंदा तलावातील पाणी बाजूच्या रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे वाहन चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी; मासुंदा तलावातील पाणी आले रस्त्यावर
नाले सफाई नीट न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर साचत आहे. तसेच सखोल भाग असल्यामुळे या ठिकाणी सक्षम पंप लावणे गरजेचे आहे.
ठाणे
नाले सफाई नीट न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर साचत आहे. तसेच सखोल भाग असल्यामुळे या ठिकाणी सक्षम पंप लावणे गरजेचे आहे. परंतु त्यासंदर्भातील दखल पालिकेने घेतली नसल्यामुळे या भागात दरवर्षीप्रमाणे आताही पाणी साचले आहे. त्यामुळे याचा फटका स्थानिकांसह वाहनचालकांना बसत आहे.