महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Corona Vaccination Thane : कोविड लसीकरणासाठी आरोग्य पथकाने केला 16 किलो मीटरचा पायी प्रवास

आरोग्य विभागाचे ( Thane Zilla Parishad Health Squad ) कोविड १९ नियंत्रण लसीकरण पथक सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दापूरमाळ गावात ( Dapurmal Village ) पोहोचल्याचे समोर आले आहे. शिवाय गावातल्या प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन पात्र असणाऱ्या सर्व गावकऱ्यांचे लसीकरण ( Vaccination of Villagers ) केले. शिवाय प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणीही ( Health Check Up ) केली.

दापूरमाळ गावात लसीकरण करतांना आरोग्य पथक
दापूरमाळ गावात लसीकरण करतांना आरोग्य पथक

By

Published : Dec 10, 2021, 9:00 PM IST

ठाणे -घनदाट झाडा-झुडपातून तब्बल सोळा किलोमीटरचा पायी प्रवास करत ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे ( Thane Zilla Parishad Health Squad ) कोविड १९ नियंत्रण लसीकरण पथक सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दापूरमाळ गावात ( Dapurmal Village ) पोहोचल्याचे समोर आले आहे. शिवाय गावातल्या प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन पात्र असणाऱ्या सर्व गावकऱ्यांचे लसीकरण ( Vaccination of Villagers) केले. शिवाय प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणीही ( Health Check Up ) केली. आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकाच्या धाडसाचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे ( Thane Zilla Parishad Chief Executive Officer Dr. Bhausaheb Dangde ) यांनी त्या पथकाने कौतूक केले. विशेष म्हणजे कालच संपूर्ण ठाणे जिल्ह्यात १ कोटीच्यावर नागरिकांचे ( 1 Crore Vaccinations Completed in Thane District ) लसीकरण झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

  • २४६ लोकसंख्येचे गाव

शहापूर तालुक्यातील कसारा भागातील विहीगाव उप केंद्रातर्गत दापूरमाळ गाव वसले आहे. विशेष म्हणजे या गावात जाण्यासाठी कोणत्याही स्वरुपात दळणवळणाची सोय नाही. त्यामुळे येथील गावकरी लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल भोरे यांच्यासह नामदेव फर्डे, बाळू नीचिते, सुजाता भोईर, भारती ठाकरे, श्रीमती झुगरे, श्रीमती खोरगडे यांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे लसीकरण केले. या गावाची एकूण लोकसंख्या २४६ असून कोविड १९ लसीकरणासाठी एकूण १३८ लाभार्थी होते. यामध्ये दोन गरोदर माता आणि तीन स्तनदा मातांचाही समावेश होता. या सर्व लोकांचे लसीकरण केल्यानंतर आरोग्य पथकाने येथे आरोग्य शिबीरही घेतले. आरोग्य शिबीर अंतर्गत बालरोग, गरोदर माता, स्तनदा माता, त्वचा रोग तपासणी केली. आवश्यक असणाऱ्याना औषधी देऊन योग्य ते मार्गदर्शन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

  • कोरोनाची भीती कमी करून लोकांमध्ये जाणीव जागृतीचे प्रयत्न

ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागात कोरोना महामारीला अटकाव करण्यासाठी प्रत्येक गावासह वाडी, पाडे, तांडे, वस्त्यांवर लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिदुर्गम भाग जरी असला तरीही त्या भागातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग नियोजन करत आहे. ग्रामीण भागातील शंभर टक्के लाभार्थी नागरिकांचे लसीकरण करणे, कोरोनाची भीती कमी करून लोकांमध्ये जाणीव जागृतीचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी सांगितले.

हेही वाचा -Omicron Patient in Dharavi : टांझानियामधून धारावीत आलेला रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह

ABOUT THE AUTHOR

...view details