महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

HC Directs Thane Collector : अभियांत्रिकी विद्यार्थ्याला चार दिवसात अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या; उच्च न्यायालयाचे निर्देश

कोल्हापूर येथील अभियांत्रिकी शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र मिळण्याकरिता उच्च न्यायालयात धाव (Court run for caste certificate) घेतली होती. ही याचिका निकाली काढत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयाने फटकारले (HC reprimanded Thane District Collector) आहे. विद्यार्थ्याला चार दिवसात जात प्रमाणपत्र देण्याचे निर्देश (issue Scheduled Tribe certificate to student ) उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. (directed to issue caste certificate) (latest news from Mumbai)

HC Directs Thane District Collector
HC Directs Thane District Collector

By

Published : Oct 24, 2022, 2:02 PM IST

मुंबई :कोल्हापूर येथील अभियांत्रिकी शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र मिळण्याकरिता उच्च न्यायालयात धाव (Court run for caste certificate) घेतली होती. ही याचिका निकाली काढत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयाने फटकारले (HC reprimanded Thane District Collector) आहे. विद्यार्थ्याला चार दिवसात जात प्रमाणपत्र देण्याचे निर्देश (issue Scheduled Tribe certificate to student ) उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. (directed to issue caste certificate) (latest news from Mumbai)

जात प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्याची न्यायालयात धाव-कोल्हापूर येथील विद्यार्थी प्रज्वल मोर याला अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमास अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रवेश घेण्याकरिता जात प्रमाणपत्र मिळण्यात उशीर होत असल्याने अखेर विद्यार्थ्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ठाणे उपविभागीय अधिकार्‍यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्याला चार दिवसात अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एम लढ्ढा यांच्या खंडपीठाने ठाणे उपविभागीय अधिकार्‍यांना दिले आहे.


अनुसूचित जमातीचा दाखला मिळण्यासाठी अर्ज-कोल्हापूर जिल्ह्यातील प्रज्वल मोर भाट या विद्यार्थ्याने 2020 मध्ये इचलकरंजी येथील सक्षम प्राधिकारी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे ठाकर अनुसूचित जमातीचा दाखला मिळण्यासाठी अर्ज केला. दाखला मिळाल्यानंतर जातपडताळणी समितीने मात्र वडीलाचा दाखला हा ठाणे येथील उपविभागीय अधिकार्‍यांचा असल्याने पडताळणी समितीने वैधताप्रमाणपत्र देण्यास नाकार दिला होता. त्याविरोधात मोरे भाट यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. याची दखल घेत न्यायालयाने मोरे भाट ही ठाकर अनुसूचित जमात हि रायगड जिल्ह्यातील असल्याची पुष्टी देत जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीला ठाकर अनुसूचित जमातीचा वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले होते.

प्रज्वल यांची जातीच्या दाखल्यासाठी धडपड -प्रज्वल यांनी उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांच्याकडे जातीच्या दाखल्यासाठी अर्ज केला. त्यावर वडिलांचा दाखला ठाण्याचा असल्याने ठाण्यातून दाखला मिळेल असे आदेश देत अर्ज फेटाळला. त्यानंतर ठाणे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जातीच्या दाखल्याची मागणी केली. त्यांनीही मोर भाट हे रायगड जिल्हातील असल्याने रायगड जिल्ह्यातून जातीचा दाखला घ्यावा असा आदेश देत अर्ज फेटाळला. त्या विरोधात प्रज्वलचे वडील पांडुरंग मोरे भाट यांनी अ‍ॅड धैर्यशील सुतार यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयात न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. आर. एम लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details